Best Marathi Movies : रसिकांच्या पसंतीस उतरलेले हे आहेत टॉप मराठी चित्रपट

150
Best Marathi Movies : रसिकांच्या पसंतीस उतरलेले हे आहेत टॉप मराठी चित्रपट

आज मराठी चित्रपटांची अवस्था फारशी चांगली नाही. एक काळ असा होता की जेव्हा उत्कृष्ट दर्जाचे मराठी चित्रपट निर्माण होत होते. आता मात्र मराठीकडे बजेट नाही, एका चांगला स्वतंत्र पटकथा लेखक मराठीमध्ये नाही. दिग्दर्शकच सबकुछ असतो. हा सबकुछ असण्याचा शाप मराठी चित्रपटसृष्टीला लागलेला आहे. (Best Marathi Movies)

मात्र प्रत्येक मराठी माणसाची अशी अपेक्षा आहे की दक्षिण भारतातल्या चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटेही गाजली पाहिजेत. आज दक्षिण भारतीय चित्रपट केवळ हिंदी चित्राटांशी नव्हे तर हॉलीवुडशी स्पर्धा करत आहेत. मराठीमध्ये देखील काही अपवाद आहेत. सैराट चित्रपटाने करोडो रुपये कमावले. श्वास चित्रपटाने मराठी सिनेसृष्टी पुन्हा जिवंत केली. आज आपण मराठीतील काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. हे चित्रपट फार जुने नव्हेत. मात्र या चित्रपटांनी रसिकांना भुरळ पाडली आहे. आजही हे चित्रपट लोक मुद्दाम पाहतात. (Best Marathi Movies)

१. चौकट राजा (१९९१) :

एका मंदबुद्धी तरुणाची ही कथा आहे. दिलीप प्रभावळकरांनी यात प्रमुख भूमिका केली असून विशेष म्हणजे खर्‍या अर्थाने मंदबुद्धी तरुणाची भूमिका त्यांनी साकारली आहे. म्हणजे बर्‍याचदा अशा भूमिका करताना कॅरिकेचर केलं जातं. जसं कोई मिल गया मधील ह्रतिक रोशन. ती वास्तववादी भूमिका नव्हती. प्रभावळकरांनी वास्तववादी भूमिका साकारुन एक इतिहास रचला होता. (Best Marathi Movies)

२. शिक्षणाच्या आयचा घो (२०१०) :

मुलांवर शिक्षणाचं प्रचंड ओझं असतं. एवढेच मार्क मिळावेत म्हणून साळेतून आणि पालकांकडूनही दबाव निर्माण केला जातो. या चित्रपटात शैक्षणिक पद्धतीवर टीका करण्यात आली आहे. मात्र हा सटायर चित्रपट होता. (Best Marathi Movies)

३. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९) :

दिनकर मारुती भोसले, एक सामान्य मराठी माणूस, जो अतिशय साधं आयुष्य जगत असतो. मात्र सतत होणारा मराठी माणसांचा अपमान यामुळे तो चवताळून उठतो आणि त्याला साक्षात छत्रपती येऊन दर्शन देतात. यातूनच चित्रपटाची कथा उलगडत जाते. महेश मांजरेकर यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. ही खंत वगळता चित्रपट अतिशय सुंदर आहे. (Best Marathi Movies)

४. दुनियादारी (२०१३) :

ही उत्कृष्ट दर्जाची कलाकारी आहे असं म्हणता येणार नाही. पण चांगला चित्रपट तो असतो, जो नेहमी लोकांच्या स्मरणात राहतो. दुनियादारी हा तसाच चित्रपट आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कादंबरीवर निर्माण झालेल्या या चित्रपटातील संवाद आणि पात्रे खूप गाजली होती. (Best Marathi Movies)

(हेही वाचा – Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद)

५. डोंबिवली फास्ट (२००५) :

दर्जेदार आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणजे डोंबिवली फास्ट. एक सामान्य माणूस त्याच्या अवतीभोवती घडणार्‍या भ्रष्टाचारामुळे पेटून उठतो आणि मग त्याची काय दशा होते, हे या चित्रपटात दाखवले आहे. बर्‍याचदा आपण भ्रष्टाचार करतोय, हे देखील आपल्याला माहित नसते. इतका तो अंगवळणी पडलेला असतो. या चित्रपटात भ्रष्टाचाराचे सौम्य स्वरुप छान दाखवण्यात आले आहे आणि एका सजग नागरिक मूर्ख आणि भ्रष्ट लोकांच्या गर्दीत गुन्हेगार आणि वेदा ठरवला जातो. निशिकांत कामत दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे आणि औदुंबर आफळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Best Marathi Movies)

६. मी वसंतराव (२०२२) :

दिग्गज वसंतराव देशपांडे यांचा हा जीवनपट शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार दर्शवतो. ही एक सुंदर, संगीतमय कलाकृती आहे. राहुल देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, अनिता दाते आणि सारंग साठ्ये यांनी भूमिका साकारल्या आहेत. स्वतः राहुल देशपांडे हे वसंतरावांच्या भूमिकेत आहेत. (Best Marathi Movies)

हे वरील चित्रपट जर तुम्ही बघितले नसतील तर आजच बघा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हे चित्रपट कसे वाटले? तसेच तुमचे आवडते चित्रपट कोणकोणते आहेत आणि ते तुम्हाला का आवडतात हे देखील सांगा. (Best Marathi Movies)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.