Monsoon Road Trip : पावसाळ्यात रोड ट्रिपसाठी ‘हे’ आहेत देशातील सर्वात सुंदर मार्ग

पावसाळा सुरू झाला की, प्रत्येकाला बाहेर फिरण्याचे वेध लागतात. भर पावसात लॉंग रोड ट्रिपला जायला कोणाला नाही आवडणार? आपण भारतातील अशाच सुंदर रोड ट्रिपची माहिती घेणार आहोत. फ्लाइट, बस, ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही या रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा! )

मुंबई ते गोवा

अंतर – ५५० ते ६०० किलोमीटर ( ११ ते १२ तास )

पावसाळ्यात लॉंग ड्राईव्हवर जायचे असेल तर तुम्ही मुंबई ते गोवा हा प्रवास करू शकता. मुंबई ते गोवा या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला वाटेत चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सुंदर निसर्गरम्य ठिकाणं, धबधबे पाहता येतील. या मार्गावर अनेक ढाबे आहेत याठिकाणी तुम्ही चविष्ट पदार्थ खाऊ शकता. मुंबईहून गोव्याला NH48 मार्गे जाऊ शकता.

मुंबई ते माळशेज

अंतर – १२० – १३० किलोमीटर (३ ते ४ तास )

महाबळेश्वर – माथेरानसारखे माळशेज घाट सुद्धा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर पर्यटकांना आकर्षित करतो. गेल्या काही वर्षातील पर्यटक संख्या लक्षात घेता माळशेज घाटात अनेक campaign सुरू झाले आहेत. कॅम्पमध्ये एक दिवस मुक्काम करून तुम्ही संपूर्ण परिसर फिरू शकता. तसेच जवळच असलेल्या नाणेघाट या रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा भेट देऊ शकता. माळशेजला तुम्ही बाईक किंवा कारने जाऊ शकता.

उदयपूर ते माऊंट अबू
अंतर – १६३ किलोमीटर

उदयपूर ते माऊंट अबूला जाताना तुम्हाला वाटेत अनेक लॅंडस्केप दिसतील. उदयपूर ते माऊंट अबू या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला ५ ते ६ तास लागतात. माऊंट अबू हे समुद्रसपाटीपासून ४ हजार उंचीवर वसलेले आहे.

बंगलोर ते कारवार

अंतर – ५२४ किलोमीटर ( १० ते ११ तास)

बंगलोर ते कारवार या मार्गावर तुम्हाला जोग धबधबा, गोकर्ण अशी अनेक पर्यटनस्थळे लागतील. त्यामुळे या मार्गावर रोड ट्रिपचे योग्य नियोजन केले तर तुम्ही एका अविस्मरणीय रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

चेन्नई के पुद्दुचेरी

अंतर – १५१ किलोमीटर ( साडेतीन ते ४ तास)

जर तुम्हाला पावसाळ्यात वीकेंडला रोड ट्रिपला जायचे असेल तर तुम्ही चेन्नईहून पुद्दुचेरीला जाऊ शकता. इथे एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला सुंदर कलाकृती असलेल्या इमारती तुम्हाला पाहता येतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here