Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!

121

पावसाळा जवळ आला की, बहुतांश नागरिक निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्यासाठी बाहेर पडतात. लोणावळा-माथेरान या दोन जागा मुंबई-पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या जागांवार पर्यटकांची लक्षणीय गर्दी होते. यासाठीच आम्ही तुम्हाला काही हटके जागांबद्दल माहिती देणार आहोत, या जागा मुंबई-पुण्यापासून जवळ तर आहेतच शिवाय येथे पर्यटकांची जास्त गर्दीही होत नाही. त्यामुळे तुम्ही मनसोक्त तुमची सुट्टी Enjoy करू शकता. जाणून घेऊया अशाच काही हटके आणि सुंदर ठिकाणांबद्दल…

( हेही वाचा : दिल से ‘चहा’ है तुम्हे! देशभरातील या विविध चहांचा आस्वाद तुम्ही घेतलात का?)

देवकुंड धबधबा ( Devkund Waterfall)

मुंबई-पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला हा देवकुंड धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. हा धबधबा रायगड जिल्ह्यातील भिरा गावात आहे. भिरा गावातून मिनी ट्रेक करत तुम्हाला या धबधब्यावर जावे लागेल, भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. ट्रेक करताना पावसाळ्यात व्यवस्थित ग्रीप असणाऱ्या शूजचा वापर करा.

  • देवकुंड धबधबा- रायगड जिल्हा – भिरा गाव
  • मुंबईपासून अंतर – १३१ किलोमीटर
  • खर्च १००० ते १२०० प्रतिव्यक्ती ( One day)

New Project 1 1

माळशेज घाट ( Malshej Ghat)

महाबळेश्वर – माथेरानसारखे माळशेज घाट सुद्धा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर पर्यटकांना आकर्षित करतो. गेल्या काही वर्षातील पर्यटक संख्या लक्षात घेता माळशेज घाटात अनेक campaign सुरू झाले आहेत. कॅम्पमध्ये एक दिवस मुक्काम करून तुम्ही संपूर्ण परिसर फिरू शकता. तसेच जवळच असलेल्या नाणेघाट या रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा भेट देऊ शकता.

  • माळशेज घाट – ठाणे जिल्हा – (कल्याण-नगर मार्ग)
  • मुंबईपासून अंतर – १२७ किलोमीटर
  • Campaign खर्च – १५०० ते २००० प्रतिव्यक्ती

New Project 2 1

विसापूर किल्ला ( Visapur Fort)

पावसाळ्यात लोणावळ्याला जाण्यापेक्षा तुम्ही लोणावळ्यापासून जवळ असलेल्या विसापूर किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३ हजार ५५० फूट इतकी आहे. पावसाळ्यात या किल्ल्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते.

  • विसापूर किल्ला -लोणावळा- मळवली
  • पुणे ते विसापूर किल्ला अंतर – साधारण ६० किलोमीटर
  • मुंबई ते विसापूर किल्ला अंतर – ११० किलोमीटर
  • विसापूर ट्रेक पॅकेज – ८०० ते १००० प्रतिव्यक्ती

New Project 3 2

कळसुबाई शिखर ( Kalsubai Peak)

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई म्हणजेच ट्रेकर्ससाठी पर्वणी… परंतु याठिकाणी आता अवघड जागांवर शिड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोक सुद्धा अगदी सहज या शिखरावर जाऊ शकतात. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. कळसुबाई शिखराच्या परिसरात भंडारदरा धरण, रंधा धबधबा, आणि इतर अनेक निसर्ग सौंदर्याने मनमोहत करणारी ठिकाणे आहेत.

  • कळसुबाई शिखर – अहमदनगर – अकोले तालुका
  • मुंबईपासून अंतर – १५३ किलोमीटर
  • कळसुबाई ट्रेक पॅकेज – १५०० प्रतिव्यक्ती

New Project 4 1

दूधसागर धबधबा ( Dudhsagar Waterfall)

दूधसागर धबधबा मुंबई-पुण्यापासून फार लांब आहे. परंतु दोन दिवसाच्या सहलीची व्यवस्थित आखणी केल्यास तुम्ही शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशी भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असलेल्या दूधसागरला भेट देऊ शकता. हा धबधबा अभयारण्यात असल्याने येथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते. धबधब्यापासून जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक असून गोवा राज्यातील मांडवी नदीवर हा धबधबा आहे. ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात. याद्वारे तुम्हाला अंदाजे ३५०० रुपये प्रतिव्यक्ती खर्च येईल.

  • दूधसागर धबधबा – गोवा – मांडवी नदी
  • मुंबईपासून अंतर – ५७६ किलोमीटर
  • मुंबई ते दूधसागर ट्रेक पॅकेज – ३००० ते ४००० प्रतिव्यक्ती

New Project 5 1

आंबोली घाट ( Amboli Ghat)

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाट आहे. या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे येथील हवामान थंड असते. आंबोली घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक पावसाळ्यात या घाटाला भेट देतात.

आंबोली घाटातील महत्वाची ठिकाणे
नांगरतास धबधबा, घनदाट जंगल, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेव मंदिर

  • आंबोली घाट – सिंधुदुर्ग
  • मुंबईपासून अंतर – ४९० किलोमीटर

New Project 6 1

भीमाशंकर ( Bhimashankar) 

सह्याद्रीच्या कुशीत अगदी शेवटच्या टोकावर वसलेलं भीमाशंकर हे स्थान तुमच्या भोवतालचे जग, किल्ले, नद्या आणि अनेत पर्यटन स्थळांचे अनोखे दर्शन घडवते. महाराष्ट्रातील पाच जोतिर्लिंगांपैकी एक जोतिर्लिंग म्हणूनही भीमाशंकरला भाविकांच्या मनात विशेष स्थान आहे. तुम्ही वन डे पिकनिकचा आनंद घेण्यासाठी भीमाशंतर सहलीचे प्लॅनिंग करू शकता.

  • भीमाशंकर – पुणे जिल्हा
  • मुंबईपासून अंतर – साधारण २२५ किलोमीटर
  • खर्च – ८०० ते १००० प्रतिव्यक्ती
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.