Internet Data संपला म्हणून Public WiFi वापरताय तर सावधान! लगेच करा हा बदल…

104

तुमच्या स्मार्टफोनमधला डेटा संपला आणि तुम्ही जर सार्वजनिक वायफाय (Public Wifi) वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. अलिकडे प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट डेटा असतो. परंतु अतिवापरामुळे अनेकदा डेटा संपतो किंवा डेटाची बचत करण्यासाठी अनेक लोक सार्वजनिक वायफाय (Public Wifi) चा वापर करतात.

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)

सार्वजनिक वायफाय रेल्वे स्टेशन, बस अशा अनेक ठिकाणी स्थापित केलेले असतात. पण अलिकडे सार्वजनिक वायफायवरून स्मार्टफोन डेटा चोरी करणे हा हॅकर्ससाठी एक सामान्य मार्ग झाला आहे. हॅकर्स तुमच्या फोनमधून फोटो, व्हिडिओ, तुमचा पत्ता, बॅंक डिटेल्स यासारखी महत्त्वपूर्ण माहिती चोरी करू शकतात.

तुम्हाला अशा cyber attack पासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरावे, हे VPN नेटवर्क तुम्हाला सार्वजनिक नेटवर्कवर खाजगी सुविधा देते आणि युजर्स सुरक्षितपणे इंटरनेट वापरू शकतात.

VPN कसे सेट करायचे?

  • स्मार्टफोनमध्ये प्ले-स्टोअरवरून VPN App डाऊनलोड करा. windscribe हे व्हिपीएन अ‍ॅप तुम्ही वापरू शकता.
  • त्यानंतर हे अ‍ॅप ओपन करून तुम्हाला हवी असलेली लोकेशन सेट करा, Connect या पर्यायावर क्लिक करा.
  • कनेक्ट केल्यावर तुमचा स्मार्टफोन VPN नेटवर्कशी कनेक्ट होईल.
  • VPN अ‍ॅपचा वापर करून तुम्ही आपली वैयक्तिक माहिती इतरांपासून सुरक्षित ठेऊ शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.