सध्या जगभरात कार्बनचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे पृथ्वीवर तापमान वाढले आहे. म्हणून जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन सर्व देशांना केले जात आहे. मात्र अशा परिस्थिती जगात तीन देश आहेत, ज्यामध्ये झिरो कार्बन उत्सर्जन होत आहे. त्यातील एक देश भारताचा चक्क शेजारी भूतान हा देश आहे.
इतर कोणते दोन देश आहेत?
जगातील तीन देशांमध्ये झिरो कार्बन उत्सर्जन होते, त्यातील उर्वरित दोन देश हे अमेरिका खंडातील आहेत. भूतान, सुरीनाम आणि पनामा या तीन देशांना कार्बन निगेटिव्ह देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. कार्बन उत्सर्जन/फुटप्रिंट म्हणजे एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने केलेल्या एकूण कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण असते. हे उत्सर्जन कार्बन डायऑक्साइड किंवा हरित वायूंच्या स्वरूपात होते. हे हरित वायू कमी करण्याचे आव्हान जगासमोर आहे. जेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि त्याच्या समतुल्य हरित वायूंचे उत्सर्जन शून्यापेक्षा कमी असते तेव्हा त्याला कार्बन निगेटीव्ह म्हणतात. भूतानची जंगले वर्षाला सुमारे ९ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. तर या देशातून दरवर्षी होणारे एकूण कार्बन उत्सर्जन ४ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे. सूरीनाम या देशात पृथ्वीवरील सर्वात घनदाट जंगल आहे. हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे. या देशाचा ९७ टक्के भूभाग हा जंगलांचा आहे. तर तिसरा देश पनामा. दक्षिण अमेरिकेतीलच हा देश आहे. या देशाचा ५७ टक्के भूभाग हा वनसंपदांनी व्यापलेला आहे.
(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)
Join Our WhatsApp Community