त्याच्या खात्यात जमा झाले लाखो रुपये! म्हणाला मोदींनी पाठवले आहेत, पण…

मोदी है तो मुमकिन है, अच्छे दिन आने वाले है… मोदी सरकारने निवडणुकांच्या दरम्यान दिलेल्या घोषणांचे अनेक मीम्स खूपच लोकप्रिय आहेत. सर्वांच्या खात्यात मोदी 15 लाख रुपये कधी पाठवणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. बिहारमधील एका व्यक्तीच्या खात्यात अचानक 5.50 लाख रुपये जमा झाले. आणि हे पैसे आपल्याला मोदींनी पाठवल्याचे तो आपल्याला सांगू लागला. पण याची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आता हे कसं झालं याचं तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.

काय झाले नेमके?

बिहारमधील खागरिया जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकेकडून रणजीत दास यांच्या अकाऊंटमध्ये अचानक 5.50 लाख रुपयांची रक्कम जमा झाली. काही तांत्रिक बिघाडामुळे चुकून बॅंकेकडून ही रक्कम हस्तांतरित झाल्याचे बँकेच्या लक्षात आले. तेव्हा बँकेकडून हे पैसे परत करण्याची विनंती दास यांना करण्यात आली. परंतु हे पैसे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवले असल्याने मी ते परत करणार नाही, असे दास यांचे म्हणणे होते.

पैसे देणार नाही

हा विभाग मानसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याने बॅंकेकडून यासंदर्भातील नोटीस मानसी पोलिस स्टेशनला पाठवण्यात आली. त्यामुळे याबाबत रणजीत दास यांच्याकडे चौकशी केली असता, आपण ती रक्कम खर्च केली आहे आणि आपण ती परत देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या अकाऊंटला जेव्हा रक्कम जमा झाली तेव्हा मी खूप खूश होतो. मला वाटलं ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवली आहे. त्यांनी प्रत्येकाला 15 लाख देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेप्रमाणे हा त्या रक्कमेचा पहिला हफ्ता असावा, असं मला वाटलं आणि मी ती रक्कम खर्च सुद्धा केली. आता माझ्या अकाऊंटला पैसे नाहीत, असे पोलिसांच्या अटकेत असलेल्या दास यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

संबंधित तक्रारीवरुन रणजीत दास याला अटक केली असून पुढील तपास चालू आहे, असे मानसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी दिपक कुमार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here