यंदाही गरबा-दांडियाशिवाय नवरात्रोत्सव! 

दांडिया-गरबा यांचे आयोजन न करता सार्वजनिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

186

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सण-उत्सव निर्बंधात साजरे केले जात आहेत. आता ब-यापैकी निर्बंध शिथिल केले असले, तरी राज्यात कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत आहेत. त्यात कोरोनाच्या तिस-या लाटेची टांगती तलवार असल्याने, आठवड्याभरात येणा-या नवरात्रीसाठी आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये दांडिया-गरबा यांचे आयोजन न करता सार्वजनिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

कोरोना खबरदारीच्या  नियमावलीनुसार, सार्वजनिक मंडळांच्या उत्सवासाठी 4 फुटी तर, घरगुती उत्सवासाठी 2 फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असू नये, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझेशन आणि कोरोनासंबंधीच्या सगळ्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दांडिया-गरबा यांचे आयोजन न करता सार्वजनिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याबाबत उपायुक्त हर्षद काळे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

(हेही वाचा : शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली शहरांचा घोटला गळा!)

अशी आहे नियमावली!

  • सार्वजनिक मंडळांनी मंडप मर्यादित आकाराचे उभारावेत
  • आरोग्य, रक्तदान, शिबिरे, स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.
  • मंडपाच्या मुख्य द्वाराचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
  • प्रसाद वाटणे, फुले अर्पण करणे टाळावे.
  • आगमन – विसर्जनाला दहापेक्षा जास्त जण नसावेत.
  • मंडप आवारात हार, फुले, प्रसाद विक्री स्टॅाल नको
  • मंडपात एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त गर्दी नको.
  • विसर्जन स्थळी मूर्ती विभाग कार्यालयाकडे जमा कराव्यात.
  • कंटेंमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.