बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कारावर अहिराणी ‘यासनी मायनी यासले’ची मोहोर

सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित महाराष्ट्राच्या नाट्यवर्तुळात महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या ६ व्या वर्षी ज्ञानदीप कलामंच, ठाणे यांच्या ‘यासनी मायनी यासले’ या अहिराणी बोलीतील एकांकिकेने प्रथम क्रमांकाच्या नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कारावर आपले नाव कोरले. द्वितीय क्रमांकाचा सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार कलांश नाट्यसंस्थेच्या ‘जिन्याखालची खोली’ (चिपळूण/कोंकणी) यांना तर तृतीय क्रमांकाचा सुशीला केशव गोविलकर पुरस्कार एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर यांच्या ‘आखाडा’ (घाटी) यांना मिळाला. लक्षवेधी एकांकिकेचा संगीतकार राजू पोतदार पुरस्कार गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबईच्या ‘कोळसा’ (कोल्हापूरी) या एकांकिकेने मिळवला.

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)- मुंबई, दीपक फरसाण मार्ट आणि मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ यांच्या सहकायार्र्ने या वर्षीच्या स्पर्धेची अंतिम फेरी दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये पार पडली. या वर्षी राज्यभरातून ३५ संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ संकलक व मालिका निर्माते विद्याधर पाठारे यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसिध्द मालिका व चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि ज्येष्ठ कवी, चित्रपटलेखक व राज्य मराठी विकास संस्थेचा संचालक संजय कृष्णाजी पाटील व नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

व्यासपीठावर चिन्मयी सुमीत व संजय पाटील यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक विवेक देशपांडे, भाऊ कोरगांवकर, अभिनेत्री श्रध्दा हांडे, दीपक फरसाण मार्टचे चिराग गुप्ता, सुप्रिया प्रॉडक्शन्सच्या सुप्रिया चव्हाण व व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुध्दीसागर, लेखक-दिग्दर्शक देवेन्द्र पेम आणि लेखक-अभिनेते अभिजीत गुरु यांनी काम पाहीले.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बोली एका व्यासपीठावर आणण्यासाठी होणार्‍या या प्रयत्नांबद्दल चिन्मयी सुमीत आणि संजय कृष्णाजी पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. या बोली जपण्यासाठी आपण सर्वांनीच गांभिर्याने प्रयत्न केले पाहीजेत, असे ते म्हणाले.

मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघाच्या दिवंगत झालेल्या निर्मात्यांना – गोविंद चव्हाण, भालचंद्र नाईक, संतोष कोचरेकर, आनंदा नांदोस्कर यांना दृक-श्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.

पुढील वर्षीच्या तारखेची घोषणा व नवीन एकांकिकांना प्रवेश

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेसाठी स्पर्धकांना वेगळ्या बोलीतील वेगळ्या एकांकिका लिहीण्यासाठी, तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी पुढील वर्षीच्या तारखांची घोषणा यावेळी करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये १२ ते १४ जानेवारी या कालावधीत प्राथमिक तर २२ जानेवारी रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. योगायोगाने या वेळच्या स्पर्धेमध्ये पहिल्या आलेल्या तिन्ही एकांकिका स्वतंत्रपणे या स्पर्धेच्या निमित्ताने लिहील्या गेलेल्या आहेत. याचा विचार करुन आयएनटी स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेसाठीही बोलीमध्ये स्वतंत्रपणे अधिकाधिक एकांकिका लिहील्या जाव्यात, म्हणून पुढील वर्षीपासून प्रादेशिक बोलीमध्ये नव्याने लिहीलेल्या एकांकिकांनाच प्रवेश दिला जाईल, असेही आयोजकांनी जाहीर केले.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

सांघिक :

 • प्रथम : नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार
  यासनी मायनी यासले (ज्ञानदीप कलामंच, ठाणे (अहिराणी)
 • द्वितीय : सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार
  जिन्याखालची खोली (कलांश नाट्यसंस्था, मुंबई (चिपळूण/कोंकणी)
 • तृतीय : सुशीला केशव गोविलकर पुरस्कार
  आखाडा (एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर (घाटी)
 • लक्षवेधी : संगीतकार राजू पोतदार पुरस्कार
  कोळसा (गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई (कोल्हापूरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता :

 • प्रथम : विनय आपटे पुरस्कार
  महेश किरपेकर (जिन्याखालची खोली, कलांश नाट्यसंस्था, मुंबई)
 • द्वितीय : सतीश तारे पुरस्कार
  सचिन फडतरे (यासनी मायनी यासले, ज्ञानदीप कलामंच, ठाणे)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
  प्रथम : आशालता वाबगावकर पुरस्कार
  दर्शना पाटील (यासनी मायनी यासले, ज्ञानदीप कलामंच, ठाणे)
 • द्वितीय : प्रियांका शाह पुरस्कार
  मनाली राजश्री (जीर्णोद्धार, अभिनय – कल्याण)
 • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : कुलदीप पवार पुरस्कार
  औंदुंबर बाबर (आखाडा, एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर)
 • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : याज्ञसेना देशपांडे पुरस्कार
  विजया गुंडप (आखाडा, एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर)
 • सर्वोत्कृष्ट विनोदी लेखन : रमेश पवार पुरस्कार
  भावेश सुरेश आंबडसकर (आखाडा, एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना :

 • प्रथम : राघू बंगेरा पुरस्कार
  सिद्धेश नांदलसकर (कोळसा, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई)
 • द्वितीय : उमेश मुळीक पुरस्कार
  समीर सावंत (जिन्याखालची खोली, कलांश नाट्यसंस्था, मुंबई)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : अरुण कानविंदे पुरस्कार
  प्रथम : ओमकार – कार्तिक – प्रणीत (आखाडा, एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर)
  द्वितीय : ऋषभ करंगुटकर – अक्षय धांगट (कोळसा, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई)

सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन :

 • गोविंद चव्हाण पुरस्कार
 • जिन्याखालची खोली (कलांश नाट्यसंस्था, मुंबई)

सर्वोत्कृष्ट लेखक : गंगाराम गवाणकर पुरस्कृत

 • प्रथम : विजय सुलताने (यासनी मायनी यासले, ज्ञानदीप कलामंच, ठाणे)
 • द्वितीय : अनिकेत शिगवण (जिन्याखालची खोली, कलांश नाट्यसंस्था, मुंबई)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : चेतन दातार पुरस्कार

 • प्रथम : राजेश राणे (यासनी मायनी यासले, ज्ञानदीप कलामंच, ठाणे)
 • द्वितीय : अमित पाटील, सिद्धेश साळवी (कोळसा, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई)

सर्वोत्कृष्ट नेपथ्य :

 • प्रथम : सखाराम भावे पुरस्कार
  विशाल भालेकर (तहान, के. एम. प्रॉडक्शन, ठाणे)
 • द्वितीय : रघुवीर तळाशीलकर पुरस्कार
  सागर रणदिवे (जीर्णोद्धार, अभिनय – कल्याण)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा :

 • प्रथम : सनईवादक सीताराम जिव्या सावर्डेकर पुरस्कार
  संस्कृती पवार (कोळसा, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई)
 • द्वितीय : रंगनाथ वामन कुलकर्णी पुरस्कार
  विशाल भालेकर (तहान, के. एम. प्रॉडक्शन, ठाणे)
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा : रंगमहर्षी कृष्णा बोरकर पुरस्कार
  प्रथम : अनुष्का बोर्‍हाडे (तहान, के. एम. प्रॉडक्शन, ठाणे)
  द्वितीय : केदार ओटवणेकर (यासनी मायनी यासले, ज्ञानदीप कलामंच, ठाणे)
 • सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय : डॉ. उत्कर्षा बिर्जे पुरस्कार
  पूजा कांबळे (तहान, के. एम. प्रॉडक्शन, ठाणे)

अभिनय उत्तेजनार्थ

 • रोशनी मोंडे (जिन्याखालची खोली, कलांश नाट्यसंस्था, मुंबई))
 • यश जाधव (कोळसा, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई)
 • शिवराम गावडे (जीर्णोद्धार, अभिनय – कल्याण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here