
रंगांमध्ये रंगून जाण्याचा उत्सव म्हणजे होळी होय. होळी हा भारतभर साजरा करण्यात येणारा उत्साहाने आणि रंगांनी परिपूर्ण असलेला एक सण आहे. होळी पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं. आपल्या आयुष्यातली सर्व प्रकारची नकारात्मकता होळीच्या अग्निमध्ये नष्ट व्हावी; अशी, होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि तिची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर दुसरा दिवर असतो तो धुलिवंदनाचा. या दिवशी रंगांची उधळण करत सणाचा आनंद साजरा केला जातो.
आनंद आणि संगीत यांचा खूप जुना ऋणानुबंध आहे. आपल्या भारतात प्रत्येक उत्सवाची ठराविक गाणी असतात. त्याप्रमाणेच होळीचीही पुष्कळ गाणी आहेत. ही गाणी रंग खेळताना सर्वत्र वाजवण्यात येतात. बॉलीवूड गाण्यांच्या बेधुंद एनर्जीशिवाय कोणताही होळीचा उत्सव पूर्ण होत नाही. कालातीत क्लासिक्सपासून ते आधुनिक चार्टबस्टरपर्यंत, बॉलीवूडची होळीसाठी मूड सेट करणारी असंख्य गाणी आहेत. त्यांपैकीच काही निवडक काळातीत असलेली गाणी जी तुमच्या प्लेलिस्टमध्ये असायलाच हवीत, ती गाणी कोणती ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, पाहुयात.. (bollywood holi song)
(हेही वाचा – ‘रोजा’ सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग)
रंग बरसे – सिलसिला (१९८१)
महानायक अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या “रंग बरसे” या गाण्याशिवाय कोणतीही होळीची प्लेलिस्ट पूर्ण होत नाही. कवी हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेले शब्द आणि शिव-हरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं एक होळीचं सदाबहार गाणं आहे. या गण्यातले खेळकर शब्द आणि अमिताभ यांचा शक्तिशाली आवाज हा प्रत्येक होळीच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे.
होली के दिन – शोले (१९७५)
शोले चित्रपटातलं आणखी एक कालातीत क्लासिक गाणं “होली के दिन” हे मनामध्ये निर्मळ आनंद आणि उत्साह जागवतं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं होळीची मजा आणि उत्साह वाढवते.
बलम पिचकारी – ये जवानी है दिवानी (२०१३)
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित केलेलं “बलम पिचकारी” हे गाणं या उत्सवादरम्यान आवर्जून वाजवलं पाहिजे. विशाल दादलानी आणि शाल्मली खोब्रागडे यांनी गायलेलं हे गाणं तरुणाईचा उत्साह वाढवतं. हे गाणं खासकरून होळीच्या पार्ट्यांमध्ये वाजवलं जातं.
डू मी अ फेवर, लेट्स प्ले होली – वक्त (२००५)
अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं, तसंच अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित केलेलं “डू मी अ फेवर, लेट्स प्ले होली” हे गाणं कोणत्याही होळीच्या उत्सवात खेळकर आणि उत्साही वातावरण निर्माण करतं. (bollywood holi song)
(हेही वाचा – Holi Festival 2025 : पालखी, निशाण आणि कोकणातील शिमगा)
होली खेले रघुवीरा – बागबान (२००३)
बागबानमधलं “होली खेले रघुवीरा” हे क्लासिक गाणं घेऊन अमिताभ बच्चन पुन्हा होळी दणक्यात साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग आणि उदित नारायण यांच्यासोबत अमिताभ यांनी गायलेलं हे गाणं होळीच्या पारंपारिक उत्सवाचं वर्णन करतं.
जय जय शिवशंकर – युद्ध (२०१९)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर चित्रित केलेलं हे हाय एनर्जी असलेलं होळीचं गाणं अलीकडेच हिट झालं आहे. हे गाणं होळीच्या पार्टीला एक विलक्षण एनर्जी आणतं. विशाल ददलानी आणि बेनी दयाल यांनी गायलेलं “जय जय शिवशंकर” या गाण्यामध्ये हाय एनर्जी बिट्स आणि स्ट्रॉंग डान्स स्टेप्सचं मिश्रण आहे.
छन के मोहल्ला – ॲक्शन रिप्ले (२०१०)
“अॅक्शन रिप्ले” चित्रपटातलं “छन के मोहल्ला” हे गाणं ऐश्वर्या राय आणि नेहा धुपिया यांच्यावर चित्रित केलेलं आहे. सुनिधी चौहान आणि रितू पाठक यांनी गायलेलं हे गाणं परफेक्ट तालांसह होळीच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करतं.
बद्री की दुल्हनिया – बद्रीनाथ की दुल्हनिया (२०१७)
वरुण धवन आणि आलिया भट्ट अभिनीत ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातलं हे होळीचं गाणं आधुनिक काळातलं गाणं आहे. देव नेगी, नेहा कक्कर, मोनाली ठाकूर आणि इक्का यांनी गायलेलं “बद्री की दुल्हनिया” हे गाणं सर्वांनाच भुरळ घालतं. (bollywood holi song)
(हेही वाचा – holi special food : सण म्हणजे खमंग जेवणाचा आनंद; होळीला महाराष्ट्रात केले जातात हे पदार्थ!)
सोनी सोनी – मोहब्बतें (२०००)
मोहब्बतें चित्रपटातलं “सोनी सोनी” हे एक होळीचं रोमँटिक गाणे आहे. या गाण्यामध्ये होळीच्या उत्सवाचा सार उत्तम प्रकारे टिपलेला आहे. उदित नारायण, जसविंदर नरुला आणि इतरांनी गायलेल्या या गाण्यामुळे होळीच्या उत्सवामध्ये एक प्रेमाचा वेगळाच रंग भरून देतं.
गो पागल – जॉली एलएलबी २ (२०१७)
जर तुम्हाला फास्ट बिट्सची गाणी आणि क्रेझी वातावरण आवडत असेल तर तुमच्यासाठी हे गाणं परफेक्ट आहे. जॉली एलएलबी २ चित्रपटातलं “गो पागल” हे गाणं होळीसाठी परिपूर्ण आहे. रफ्तार आणि निंदी कौर यांनी गायलेलं हे गाणं होळीच्या पार्टीमध्ये जंगली एनर्जी आणि क्रेझीनेस वाढवतं.
बॉलीवूडची ही गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये ऍड करून आनंदाने रंगांची उधळण करत होळी साजरी करा. (bollywood holi song)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community