बोरिवली हे मुंबईतलं एक महत्वाचं स्थानक आहे. बोरिवली हे उपनगर असून मुंबईच्या उत्तर-पश्चिम टोकाला वसलेले आहे. इथे मराठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गुजराती भाषिकही मोठ्या प्रमाणात इथे राहतात. बोरिवली रेल्वे स्थानक हे दक्षिणेकडील चर्चगेट आणि उत्तरेकडील विरारकडे जाणारे मुंबई लोकल गाड्यांचे मूळ रेल्वे स्थानक आहे. तसेच काही एक्सप्रेस गाड्या या रेल्वे स्थानकावर थांबतात ज्यामुळे दूरच्या स्थळी प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा मिळतो. (Borivali Railway Station)
बोरिवली स्थानकाजवळ अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांना तुम्ही अवश्य भेट दिली पाहिजे. विशेष म्हणजे या महत्वाच्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. चला तर जाणून घेऊया बोरिवलीत कोणत्या स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. (Borivali Railway Station)
वीर सावरकर उद्यान :
वीर सावरकर उद्यान हे मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागातील एक महत्वाचे उद्यान आहे. १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी वॉकिंग ट्रॅक, स्केटिंग रिंक, राइड्स आणि सॅंड प्ले यांसारखी आकर्षणे आहेत. हे उद्यान मोठ्या वटवृक्षांनी वेढलेले आहे. मातृभूमीचे महान सुपुत्र स्वा. सावरकर यांना समर्पित हे उद्यान बोरिवलीकरांचे अतिशय आवडते उद्यान आहे. तसेच इथे लांबूनही लोक येतात आणि चांगला वेळ घालवतात. (Borivali Railway Station)
फिश पार्क :
फिश पार्क हे बोरिवलीच्या आयसी कॉलनी परिसरातील एक आकर्षणाचे केंद्र आहे. ज्यामध्ये कोई आणि गोल्डफिश सारख्या असंख्य माशांच्या प्रजाती आहेत. फिश पार्क हे कुटुंब आणि मित्रांसह चांगला वेळ घालवण्यासाठी छान ठिकाण आहे. लहान मुलं इथे येऊन रमतात. (Borivali Railway Station)
गोराई बीच :
मुंबई शहर हे मुळातच एक बेट असल्यामुळे इथे अनेक ठिकाणी समुद्र किनारे आहेत. गोराई बीच हा देखील महत्वाचा समुद्र किनारा. इथे अनेक पर्यटक येतात आणि सनसेटचा आनंद घेतात. संध्याकाळी छान वातावरणात प्रेमी युगुलही आपल्या प्रेमाची कबुली द्यायला इथे येतात. इथे बीच रिसॉर्ट्स, हॉलिडे व्हिला आणि होमस्टे अशा अनेक सुविधा असल्यामुळे विकेन्डचा आनंद लुटण्यासाठी हे चांगले ठिकाण आहे. गोंगाटापासून दूर निसर्गमय आणि अतिशय शांत वातावरणात राहण्याची मज्जाच वेगळी असते. (Borivali Railway Station)
मंडपेश्वर लेणी :
मुंबईतील बोरिवली येथील पोईसर पर्वताजवळील मंडपेश्वर लेणी पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. इथे ८व्या शतकातील शिव मंदिर आहे. ही गुहा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत आणि त्यात अनेक शिल्पे आहेत. (Borivali Railway Station)
(हेही वाचा – Voting Awareness: मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘मुंबई रेडिओ’चा नवा उपक्रम)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान :
मुंबईतील जुन्या आणि अतिशय महत्वाच्या ठिकाणांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा अव्वल क्रमांक लागतो. १९६९ मध्ये स्थापन झालेले ८७-चौरस-किलोमीटर संरक्षित क्षेत्रात वसलेले हे उद्यान लोकांच्या गर्दीने भरलेले असते. इथे सकाळी स्थानिक लोक जॉगिंग करायलाही येतात. तसेच टायगर आणि लायन सफारीचा आनंदही तुम्ही लुटू शकता. इथे २४०० वर्ष जुनी कान्हेरी लेणी आहे. दरवर्षी २ दशलक्ष लोक या उद्यानाल अभेट देतात. (Borivali Railway Station)
कान्हेरी गुंफा :
मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी स्थित असून इथे १०९ गुहा आणि दगडी स्मारके आहेत. “कान्हेरी” हे नाव कृष्णगिरी या संस्कृत शब्दावरून पडले आहे, ज्याचा अर्थ “काळा पर्वत” आहे. लेणी मूळतः विहार (राहण्याची ठिकाणे, अभ्यास आणि ध्यानाची जागा) आणि चैत्य (सामुदायिक उपासनेसाठी हॉल) होती. विशेष म्हणजे, अवलोकितेश्वर ही येथे आढळणारी एक विशिष्ट आकृती आहे. या लेणींना भेट देणे म्हणजे इतिहास जागवणे होय! (Borivali Railway Station)
पॅगोडा :
ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे भारतातील मुंबईच्या वायव्य भागात गोराईजवळ स्थित एक भव्य बौद्ध ध्यानमंदिर आहे. ८ फेब्रुवारी २००९ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पॅगोडाचे उद्घाटन करण्यात आले. हे शांतता आणि अध्यात्माचे स्मारक आहे. पॅगोडामध्ये सुमारे ८,००० विपश्यना ध्यानकर्ते बसू शकतात, म्हणूनच हे जगातील सर्वात मोठे ध्यानगृह आहे. पॅगोडाच्या मध्यभागी कोणत्याही आधारस्तंभांशिवाय बांधलेला जगातील सर्वात मोठा दगडी घुमट आहे. घुमटाच्या मध्यवर्ती लॉकिंग स्टोनमध्ये गौतम बुद्धाच्या हाडांचे अवशेष ठेवण्यात आले होते, ज्यामुळे हे एक पवित्र स्थान बनले. (Borivali Railway Station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community