अनेक जण पिण्यासाठी प्लास्टीक किंवा स्टीलची पाण्याची बाटलीसोबत बाळगतात. मात्र ही बाटली रोज नीट धुतली जात नाही. त्यामुळे त्यातील अनेक सूक्ष्म जीवाणूंमुळे आजारी पडण्याची शक्यता असते. पाण्याच्या बाटलीत टाॅयलेट सीटपेक्षा 40 हजार पट अधिक जीवाणू असतात, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढला आहे.
अमेरिकेतील वाॅटरफिल्टरगुरु डाॅट काॅम या वेबसाइटने म्हटले आहे की, केलेल्या तपासणीत बाटलीत अनेक जीवाणू सापडले. बेसिलस बॅक्टेरियामुळे पोटांचे विकार जडतात.
( हेही वाचा: मोबाईलमधील प्री-इन्स्टॉल अॅपही आता हटवता येणार )
नेमके काय करावे?
- पाण्याच्या बाटलीच्या बुचामध्ये स्वयंपाकघरातील भांड्यांच्या सिंकपेक्षा दुप्पट जीवाणू असल्याचे संशोधकांना आढळले.
- दिवसातून एकदा तरी पाण्याच्या बाटलीचा तळ व आतील भाग, बाटलीच्या तोंडाचा भाग, झाकण हे साबण, गरम पाण्याने स्वच्छ धुवावे वा आठवड्यात एकदा तरी ती बाटली सॅनिटाईझ करावी.
- धुतलेली बाटली उन्हामध्ये सुकवावी, त्यामुळे या बाटलीतील जीवाणू नष्ट होण्यास मदत मिळते.
कोणती बाटली सर्वात सुरक्षित?
काचेची बाटली ही सर्वात सुरक्षित आहे. मात्र, ती सोबत बाळगताना एखाद्या वेळेस फुटण्याचाही धोका असतो, ही बाटली नेणे शक्य नसेल तर जी प्लॅस्टीक किंवा स्टीलची बाटलीसोबत बाळगाल. ती तोंडाला लावून कधीही पाणी पिऊ नका, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.