फक्त आवाज द्या, सिलेंडर येणार दारात

150

घरगुती सिलेंडर संपला की नवीन सिलेंडरची टाकी घरात येईपर्यंत गृहिणींच्या जीवात जीव येत नाही. त्यामुळेच आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(BPCL)ने गॅस नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता कुठल्याही इंटरनेट सुविधेशिवाय ग्राहक फक्त आपल्या आवाजानेच घरगुती एलपीजी सिलेंडर बूक करू शकणार आहेत. यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्या ग्राहकांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

इंटरनेट सुविधा नसलेल्या ग्राहकांना होणार लाभ

बीपीसीएलने गुरुवारी आवाजावर आधारित डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. UPI123PAYद्वारे आता ग्राहक गॅस बुकिंगसाठी डिजिटल पेमेंट करू शकतात. यामुळे भारतगॅस उपभोक्त्यांना याचा फायदा होणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नाही त्यांना आपल्या आवाजाने सिलेंडर नोंदणी करता येणार आहे.

(हेही वाचाः मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान)

अशी करा नोंदणी

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवड्यात UPI123PAY ही डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या अल्ट्राकॅश मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना सिलेंडर बुकिंगचे पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI)द्वारे हे अ‍ॅप अधिकृत करण्यात आले आहे. गॅस नोंदणी करताना भारतगॅस उपभोक्त्यांना 080-4516-3554 या क्रमांकावर संपर्क करुन नोंदणी करता येणार आहे, तसेच सिलेंडरचे पेमेंट सुद्धा करता येणार आहे.

इतक्या ग्राहकांना होणार फायदा

या सुविधेमुळे दुर्गम ग्रामीण भागातील तब्बल 4 करोड भारतगॅस उपभोक्त्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या प्रकारची सुविधा देणारी बीपीसीएल ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. बीपीसीएल कंपनी अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्राहकांना ही सुविधा देणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील ग्राहक देखील डिजिटल पेमेंटला जोडले जाणार आहेत. लाँचच्या आधीच्या महिन्यात 13 हजार भारतगॅस ग्राहकांनी 1 कोटींहून अधिकचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः भारत आणि पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.