-
ऋजुता लुकतुके
भारतात बनलेलं जागतिक दर्जाचं मद्य कुठलं असा प्रश्न विचारला तर लगेचच नाव समोर येईल ते ओल्ड माँक या रमचं. अनेकांना तर हे भारतात तयार होतं यावरच विश्वास बसणार नाही. व्हॅनिला फ्लेवर आणि रिचवायला हलकं असं हे मद्य या उद्योगातील भारताची ओळख बनलं आहे. कपिल मोहन (Kapil Mohan) या भारतीय सैन्यातून ब्रिगेडिअर पदावर निवृत्त झालेल्या यौद्ध्याने हे मद्य बनवलं आहे. गोल्डन ईगल आणि सॅलॉन नंबर १ हे ब्रँडही मोहन यांचेच. सध्या ओल्ड माँक हे जगातील तिसऱ्या खपाचे मद्य आहे. अनेक वर्ष या मद्याने भारतात बनणाऱ्या परदेशी मद्यात सर्वोत्तम राहण्याचा मान मिळवला आहे. (Old Monk Founder)
मोहन मिकीन कंपनीचे (Mohan Meakin Company) ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. ओल्ड माँकचा प्रवास सुरू झाला तो १९५४ साली. उद्योगपती नरेंद्रनाथ मोहन (Narendranath Mohan) यांचा मोठा मुलगा वेद रतन मोहन यांनी पहिल्यांदा एक प्रकारचं परदेशी मद्य पहिल्यांदा काही भारतीयांना खिलवलं. आपल्या युरोप दौऱ्यात बेनेडिक्टमधील काही साधू एका विशिष्ट प्रकारच्या मद्याचं सेवन करताना त्यांना आढळले. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते भारतात परतले. खास ओक झाडाच्या खोडापासून बनलेल्या ड्रममध्ये त्यांनी रम बनवायला ठेवली. आणि त्यात भारतीय मसालेही घातले. सात वर्षं हे मद्य ड्रममध्ये तयार होत होतं. त्यावर प्रक्रिया होत होती. पण, त्यानंतर जे मद्य तयार झालं ते गडद रंगाचं असलं तरी चवीला उत्कृष्ट होतं. बेनेडिक्टचे साधूंकडून प्रेरणी घेतली असल्यामुळे मोहन यांनी मद्याला नाव दिलं ओल्ड माँक. (Old Monk Founder)
(हेही वाचा – तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा …)
वेद रतन यांचा अकाली मृत्यू झाल्यावर कपिल मोहन (Kapil Mohan) यांनी या उद्योगाची सूत्र आपल्या हातात घेतली. सुरुवातीला त्यांनी फक्त दर्जावर लक्ष केंद्रीत केलं. कुठल्याही जाहिरातीशिवाय हा ब्रँड केवळ त्याच्या चवीमुळे कर्णोपकर्णी भारतभर पोहोचला. एकदा ज्यांनी ओल्ड माँक चाखली आहे, त्यांना दुसऱ्या रममध्ये रस उरत नाही, असं तेव्हा बोललं जायचं. कपिल मोहन (Kapil Mohan) यांनी चांगल्या वितरणामुळे हा ब्रँड अगदी जगभर पोहोचवला. (Old Monk Founder)
शिवाय स्नॅक्स, बाटलीबंद पाणी, ज्यूस अशा उत्पादनांमध्येही कंपनीचा विस्तार केला. सैन्यात ब्रिगेडिअर असतानाही कपिल मोहन (Kapil Mohan) यांनी आपल्या कामगिरीने विशेष सेवा पदक मिळवलं होतं. तीच शिस्त आणि दर्जा त्यांनी व्यवसायातही राखला. त्यांना देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. २०१८ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Old Monk Founder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community