Britannia Industry : बिस्किटं आणि मधल्या वेळचा फराळ बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचं कुठलं उत्पादन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?

Britannia Industry : बिस्किटं आणि स्नॅक्स बनवणारी ही देशातील आघाडीची कंपनी आहे 

160
Britannia Industry : बिस्किटं आणि मधल्या वेळचा फराळ बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचं कुठलं उत्पादन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?
Britannia Industry : बिस्किटं आणि मधल्या वेळचा फराळ बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचं कुठलं उत्पादन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?
  • ऋजुता लुकतुके 

भारतात ग्राहकोपयोगी वस्तू आणि उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले आणि ब्रिटानिया अशा परदेशी कंपन्या इथं स्वातंत्र्यापूर्वीपासून आहेत. तर टाटा कन्झ्युमर, पार्ले, गोदरेज, डाबर यासारख्या देशी कंपन्या या बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर द्यायला समर्थ आहेत. यापैकी ब्रिटानिया ही कंपनी या क्षेत्रातील सगळ्यात पहिली कंपनी म्हणावी लागेल. काही ब्रिटिश उद्योजकांनी २९५ रुपयांचं भांडवल उभं करून १८९२ मध्ये ही कंपनी उभी केली. सुरुवातीला कोलकाता इथं एका छोट्या घरात ही कंपनी कार्यरत होती. सध्या या कंपनीचं भारतीय बाजारातील भाग भांडवल हे १.४१ लाख कोटी रुपये इतकं आहे. १९९३ मध्ये देशातील कापड व्यापारी बाँबे डाईंगचे नेसली वाडिया यांनी कंपनीतील सगळ्यात मोठी हिस्सेदारी विकत घेतली. आजही वाडिया कुटुंबीय कंपनीतील सगळ्यात मोठे भागधारक आहेत. (Britannia Industry)

(हेही वाचा- Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण)

बिस्किट आणि बेकरी उत्पादनांसाठी ही कंपनी अगदी सुरुवातीपासून ओळखली जाते. ब्रिटानिया मारी आणि गुड डे ही कंपनीची काही लोकप्रिय उत्पादनं आहेत. तर ब्रिटानिया ब्रेडशिवाय अनेकांची सकाळ सुरू होत नाही. बाजारातील ट्रेंड प्रमाणे बदलणं आणि नवीन उत्पादनांच्या शोधात राहणं यामुळे कंपनी इतक्या वर्षांत यशस्वी ठरली आहे. पाहूया कंपनीची लोकप्रिय अशी पाच उत्पादनं,

१. ब्रिटानिया बिस्किट – कंपनीचा ८० टक्के महसूल हा बिस्किट विक्रीतूनच येतो. कंपनीची बिस्किट उत्पादनातील विविधता बघितली तर याचं कारण लक्षात येईल. ब्रिटानिया मारी हे स्वातंत्र्यापूर्वी पासूनचं कंपनीचं पहिलं प्रसिद्ध उत्पादन होतं. पण, यात आता गुड डे, मस्का चस्का, टागर, न्यूट्रीचॉईस, ५०-५०, ट्रिट, प्युअर मॅजिक, मिल्क बिकिस, बॉरबॉन, नाईस, लिटिल हार्ट्स अशी एकापेक्षा एक बिस्किट उत्पादनं सामील झाली आहेत. या बिस्किटांची विक्री परदेशातही होते. एकट्या टायगर बिस्किटांची विक्री १५०.७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होते. कंपनी वर्षाला ४.३३ लाख टन इतकी बिस्किटं बनवते. देशात बिस्किट उत्पादनात या कंपनीचा हात धरू शकेल अशी दुसरी कंपनी नाही. (Britannia Industry)

(हेही वाचा- Lehgaon News : विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेहगाव येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन)

२. दूग्धजन्य उत्पादनं – बिस्किटांच्या खालोखाल कंपनीचा दुसऱ्या क्रमांकाचा महसूल दूग्धजन्य उत्पादनातून मिळतो. ब्रिटानिया बटर, चीझ, चीझ स्लाईस व क्यूब, चीझ स्प्रेड, ब्रिटानिया दही, लस्सी अशी उत्पादनं देशात प्रसिद्ध आहेत. (Britannia Industry)

३. ब्रिटानिया ब्रेड, टोस्ट – सकाळी सकाळी चहाबरोबर ब्रेड किंवा टोस्ट खाणाऱ्यांना ब्रिटानिया ब्रेड आणि टोस्ट माहीत नाही असं होणारच नाही. अनेकांची सकाळ त्यांनीच सुरू होते. इथंही नवीन प्रयोग करण्यात कंपनी सगळ्यात पुढे होती. भारतात विविध प्रकारची धान्य वापरून त्यापासून पाव किंवा ब्रेड तयार करण्याचं श्रेय सगळ्यात आधी ब्रिटानिया कंपनीला जातं. त्यांनी सर्वप्रथम मिलेट ब्रेट भारतात आणला. (Britannia Industry)

(हेही वाचा- Indian Economic Service : भारतीय अर्थशास्त्रीय सेवेतील अधिकाऱ्याची कामे काय असतात? त्याला किती पगार मिळतो?)

४. ब्रिटानिया केक – ब्रियानिया कंपनीचे केक गॉबल्स, फ्रूट केक तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. (Britannia Industry)

५. ब्रिटानिया क्रॉसॉ – कोव्हिड १९ च्या साथीनंतर तरुणांची आवड लक्षात घेऊन कंपनीने तयार आणि प्रक्रिया केलेले क्रॉसॉ प्रकारचे फ्रेंच केक पॅकेज्ड पद्धतीने सादर केले आहेत. त्यालाही लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. (Britannia Industry)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.