british residency lucknow : ब्रिटिश रेसिडेन्सीबद्दल काही महत्त्वाची तथ्ये जाणून घ्या!

57
british residency lucknow : ब्रिटिश रेसिडेन्सीबद्दल काही महत्त्वाची तथ्ये जाणून घ्या!

लखनऊ शहर हे भारतातली गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं. या शहराची कला, संस्कृती, संगीत यांचा एक वेगळा इतिहास आहे. जगभरातले पर्यटक मोठ्या संख्येने हे शहर पाहण्यासाठी येतात. रुमी दरवाजा, भूलभुलैय्या, बारा इमामबारा आणि ब्रिटिश रेसिडेन्सी ही या शहराची प्रमुख आकर्षणे आहेत. यांपैकी आम्ही तुम्हाला ब्रिटिश रेसिडेन्सीबद्दल सांगणार आहोत..

१८५७ चं स्वातंत्र्यसमर आणि त्यांसारख्या कित्येक लहानमोठ्या भारतीय क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या लढायांची साक्षीदार लखनऊ येथे असलेली ही ब्रिटिश रेसिडेन्सीची इमारत आहे. ही इमारत आपल्या कितीतरी भारतीय क्रांतिकारकांच्या हौतात्म्याची साक्षीदार आहे. (british residency lucknow)

(हेही वाचा – प्रतिबंधानंतरही POP मूर्ती बाजारात!)

ब्रिटिश रेसिडेन्सीची माहिती

ब्रिटिश रेसिडेन्सी ही इमारत लखनऊ इथल्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. इथे येणारे पर्यटक या इमारतीत आणि इमारतीच्या बाहेरच्या संकुलातही मनसोक्त फिरू शकतात. या इमारतीत असलेलं संग्रहालय पाहू शकतात. ब्रिटिश रेसिडेन्सीचं व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण समिती करते. पण तरीही ही इमारत इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खुली आहे.

लखनऊच्या वेढ्यादरम्यान ब्रिटिश राजवटीतले कित्येक लोक या इमारतीत लपून राहिले होते. हा वेढा जवळजवळ पाच महिने चालला होता. ब्रिटिश रेसिडेन्सीच्या इमारतीमध्ये पर्यटकांना ब्रिटिश राजवटीतले कित्येक अवशेष सापडतील आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा शोध घेता येईल. ब्रिटिश रेसिडेन्सीच्या इमारतीबाहेर असलेल्या बागेमध्ये देखील इतिहासाची अनेक चिन्हं ठेवण्यात आली आहेत. ती सुद्धा पर्यटकांना पाहता येतील. (british residency lucknow)

ब्रिटिश रेसिडेन्सीच्या इमारतीत बहुतेक वेळेस प्रदर्शने भरवली जातात. तसंच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लखनऊची स्थानिक संस्कृती दर्शवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा फायदा असा होतो की, इथे येणाऱ्या भारतातल्या आणि भारताबाहेरच्या सर्व पर्यटकांना आपल्या अमूल्य भारतीय इतिहासाची माहिती नव्याने कळण्यास मदत होते.

(हेही वाचा – Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?)

ब्रिटिश रेसिडेन्सीचा इतिहास

ही इमारत ब्रिटिश राजवटीच्या काळात अवधच्या ब्रिटिश रेसिडेंट जनरलचे निवासस्थान म्हणून ओळखली जायची. ब्रिटिश रेसिडेन्सीच्या इमारतीचं बांधकाम १७८० ते १८०० सालादरम्यान पूर्ण करण्यात आलं होतं. ब्रिटिश रेसिडेन्सीची इमारत ही स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याव्यतिरिक्त ब्रिटिश आणि भारतीय संस्कृतीची सांगड जपणारा एक पुरावादेखील आहे. (british residency lucknow)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.