Budget Travel Destination : जगभरातील या पाच देशांमध्ये ‘भारतीय रुपया’ ठरतो श्रेष्ठ! कमी पैसे खर्च करत मनसोक्त फिरा…

पर्यटनाची आवड असलेले अनेक भारतीय दरवर्षी जगभरातील विविध देशांना भेटी देत असतात. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या विकसित देशांमधील पर्यटन सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. परंतु जगात असेही अनेक देश आहेत की, ज्या राष्ट्रांच्या चलनाची किंमत भारतीय रुपयापेक्षाही कमी आहे त्यामुळे तुम्ही अशा देशांमध्ये अगदी बिनधास्त फिरायला जाऊ शकता.

( हेही वाचा : आता घरबसल्या ‘रेशनकार्ड’मध्ये Add करा नव्या सदस्याचे नाव! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

इंडोनेशिया ( Indonesia)

इंडोनेशिया हा अशा देशांपैरी एक आहे जिथे भारतीय चलनाचे मूल्य अधिक आहे. तसेच येथे भारतीयांना मोफत व्हिसा उपलब्ध होतो. त्यामुळे तुम्ही अधिक खर्च न करता इंडोनेशिया या सुंदर देशात फिरण्याचा आनंद घेऊ शकता. येथे एका रुपयाची किंमत २०७.०० इंडोनेशियन रुपया एवढी आहे.

व्हिएतनाम ( Vietnam)

व्हिएतनाम हा देश भारतीयांना भेट देण्यासाठी योग्य ठिकाण असून येथे १ रुपयाची किंमत ३३१.०४ व्हिएतनामी डोंग इतकी आहे. युद्ध संग्रहालय, सुंदर समुद्रकिनारे आणि फ्रेंच वास्तुकला हे या देशातील विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.

आईसलॅंड ( Iceland)

आईसलॅंड हा जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानला जातो. आईसलॅंडमध्ये पर्टकांना निळे सरोवर, धबधबे, हिमनद्यांचा निसर्ग सौंदर्य पाहता येईल. येथे एक रुपयाची किंमत १.५५ आईसलॅंडिक कोपरा इतकी आहे.

कंबोडिया ( Cambodia)

कंबोडिया हा देश भव्य मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशातील रॉलय पॅलेस, म्युझियम हे पर्यकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. या देशात एक रुपयाची किंमत ५८.०० कंबोडियन रियाल इतकी आहे.

दक्षिण कोरिया ( South Korea)

दक्षिण कोरियामध्ये एक रुपयाची किंमत १६.०९ दक्षिण कोरियन वोन इतकी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here