Buldhana News : बुलढाणा केस गळती प्रकरणात पाण्याचा अहवाल आला समोर

111
Buldhana News : बुलढाणा केस गळती प्रकरणात पाण्याचा अहवाल आला समोर
Buldhana News : बुलढाणा केस गळती प्रकरणात पाण्याचा अहवाल आला समोर

केस गळती (Buldhana News) किंवा टक्कल पडणे या समस्येमुळं महिला, तरुण असो की मध्यम वयाचे नागरिकही त्रस्त आहेत. बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) आणि वाढते प्रदुषण या कारणांमुळं केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्येच दिसत आहे. मात्र, राज्यातील बुलढाणा (Buldhana hair fall case) जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. (Buldhana News)

हेही वाचा-पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला

शेगांव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. (Buldhana News)

हेही वाचा-Sovereign Gold Scheme : केंद्र सरकार सोव्हरिन गोल्ड फंड बंद करणार? सध्याच्या गुंतवणूकदारांचं काय होणार?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील (Shegaon Taluka) पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तीन दिवसातच अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला. नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणे आणि नंतर केस गळती आणि तीन दिवसातच टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आल्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झालाय. या अहवालात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. (Buldhana News)

याबाबत बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे पाणी वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही. या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. नायट्रेट प्रमाण 10 टक्के असायला पाहिजे, मात्र ते 54 टक्के आहे. तसेच क्षाराचे प्रमाण 2100 आहे. ते फक्त 110 असायला पाहिजे. त्या भागातील पाणीच घातक आहे. आरसेनिक, लीड व रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (Buldhana News)

हेही वाचा-India Poverty Report : भारतीय खेड्यांमध्ये खेळतोय पैसा, ग्रामीण भागातील गरिबी ५ टक्क्यांच्याही खाली

यातील पाण्याचे नमुने हे 3 तारखेचे असून त्याची तपासणी 6 तारखेला संबंधित यंत्रणेने केली आहे. पाणी डंप केल्याने काही प्रमाणात नायट्रेतचे प्रमाण वाढत असते. नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने केस गळतात किंवा टक्कल पडत आहे, असे या केसेसमध्ये म्हणता येणार नाही,अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती व टक्कल पडण्याच्या आजाराच अद्याप निदान झालेले नाही. काल या परिसरातील केस गळतीच्या सात रुग्णांचे डोक्यावरील त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान या भागातील बोअरवेलमधील पाण्यात जड धातू (heavy metals) आढळून आल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे. (Buldhana News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.