-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियातील बोर्डर – गावसकर मालिका भारतीय संघाने गमावली असली तरी जसप्रीत बुमराहने मात्र आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने या मालिकेत ५ सामन्यांमध्ये ९ डावांत सर्वाधिक ३२ बळी मिळवले. भारतीय संघातील तो एक महत्त्वाचा घटक आहे. आणि विराट, रोहित यांच्याबरोबर बीसीसीआयच्या ए प्लस करार श्रेणीतील खेळाडू आहे. म्हणजे त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. (Bumrah Wife)
(हेही वाचा- गाईला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी Mahakumbh मध्ये दररोज ९ तास होणार महायज्ञ)
मैदानाबाहेर बुमराह फारसा सक्रिय नाही. आपला सगळा वेळ तो पत्नी संजना गणेशन आणि तीन वर्षांच्या मुलाबरोबर घालवतो. त्याची पत्नी संजना गणेशन ही क्रीडाविषयक सादरीकरण करते. आणि अशाच एका कार्यक्रमात तिला जसप्रीत बुमराहची मुलाखत घ्यायची होती. मुलाखत तर झाली. पण, बुमराह मुलाखत घेणारीच्या प्रेमातच पडला. दोघांनी काही वेळ एकत्र घालवल्यावर २०२१ मध्ये एका छोटेखानी सोहळ्यात गोव्याला लग्न केलं. त्यांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे. (Bumrah Wife)
संजना हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. पुण्याच्या सिंबॉयसिस विद्यापीठातून तिने संगणक शास्त्रात बीटेक ही पदवी मिळवली आहे. आणि त्यात तिने सुवर्ण पदकही मिळवलं आहे. त्यानंतर टेकी म्हणून नोकरी करत असताना तिला तिच्यातील फॅशन आणि टिव्ही सादरीकरणाची हौस स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आधी तिने २०१२ मध्ये फेमिना स्टाईल दिवा आणि २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. (Bumrah Wife)
(हेही वाचा- महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ ? Sharad Pawar गटातील खासदार Ajit Pawar गटात जाण्याच्या चर्चेला माध्यमांमध्ये उधाण)
२०१४ मध्ये तिने एमटीव्हीच्या स्पिल्ट्सव्हिलामध्येही भाग घेतला होता. पण, तिथे दुखापतीमुळे तिला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. तिथून तिच्या कारकीर्दीने वेगळं वळण घेतलं. आणि ती स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी क्रीडाविषयक कार्यक्रम करायला लागली. २०१९ चा आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि टी-२० विश्वचषका दरम्यान तिने सादरीकरण केलं. तर आयपीएल, बॅडमिंटन प्रिमिअर लीग आणि आयएसएलमध्येही ती खेळाडूंच्या मुलाखती घेताना झळकली. आणि अल्पावधीतच ती तिथे रुळली होती. (Bumrah Wife)
अशाच एका आयपीएल सादरीकरणाच्यावेळी तिची जसप्रीत बुमराहशी ओळख झाली. लग्नानंतर दोघं बुमराहचं मूळ गाव अहमदाबादला एका मोठ्या बंगल्यात राहतात. शिवाय दोघांचं मुंबईतही एक घर आहे. स्पोर्ट्सकीडा वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, संजनाची एकूण मिळकत ही ८ कोटी रुपये इतकी आहे. तिला एका कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे २० ते ४० लाख रुपये मिळतात. (Bumrah Wife)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community