इंटरनेटशिवाय करू शकता गुगल पे, पेटीएमसारखे UPI Payments; डायल करा फक्त हा क्रमांक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर आपण अलिकडे डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैसे देतो. कॅशलेस व्यवहार करणे प्रत्येकाला सोपे झाले आहे. मात्र ऑनलाइन कॅशलेस व्यवहार करताना अनेकदा इंटरनेट सुविधाच्या अडचणी येतात यामुळे बऱ्याचदा व्यवहार पूर्ण होत नाहीत आणि आपले व्यवहार अडकून राहतात. परंतु यापुढे असा इंटरनेट नसेल तरी तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करता येणार आहे. आता गुगल पे, फोन पे, पेटीएम अर्थात युपीआय UPI पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. फोनवरून विना इंटरनेट युपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला *99# या कोडचा वापर करावा लागेल. या कोडला USSD कोड असे म्हणतात.

( हेही वाचा : पावसाळ्यात आस्वाद घ्या खमंग भजीचा! देशातील प्रसिद्ध भजींचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?)

विना इंटरनेट UPI द्वारे कसे पाठवला पैसे? (upi payments without internet )

  1. इंटरनेट कनेक्शन नसताना तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या डायल बोर्डमध्ये *99# असे टाइप करा.
  2. डायल बोर्डमध्ये *99# हा क्रमांक टाइप करून कॉल बटणवर टॅप करा.
  3. कॉल केल्यावर तुम्हाला भाषा निवडीचा पर्याय डिस्प्लेवर येईल.
  4. पैसे पाठवण्याच्या पर्यायावर टॅप केल्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा नंबर टाइप करा आणि पैसे ट्रान्सफरचा पर्याय निवडा.
  5. UPI खात्याशी संबंधित मोबाइल क्रमांक टाइप करा आणि पैसे पाठवा या पर्यायावर टॅप करा.
  6. तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे तेवढी अंकात टाका आणि नंतर पैसे पाठवा.
  7. पॉपअपमध्ये तुम्हाला पेमेंटचे कारण लिहावे लागेल. उदाहरणार्थ तुम्ही बिल भरत असाल तर बिलाचे भाडे असे तुम्ही लिहू शकता.
  8. इंटरनेटशिवाय पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. तसेच हाच क्रमांक तुमच्या बॅंक खात्याला सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे. *99# या कोडचा वापर करत तुम्ही इंटरनेट सुविधेशिवाय UPI पेमेंट करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here