पासवर्ड लक्षात राहत नाही? अशाप्रकारे घ्या Google ची मदत

135

अलिकडे ऑनलाईन पेमेंट, बॅंकेचे व्यवहार, स्मार्टफोनमधील डेटा सुरक्षेसाठी प्रत्येक गोष्टीकरता आपण पासवर्ड ठेवतो. पण या प्रत्येक अ‍ॅपचा, ऑनलाईन पेमेंटचे पासवर्ड लक्षात ठेवणे आपल्याला शक्य नसते. तुम्हालाही या प्रकारची समस्या येत असेल तर यापुढे चिंता करण्याची गरज नाही तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी गुगलची मदत घेऊ शकता. तुमच्या गुगल अकाउंटवर तुम्ही पासवर्ड सेव्ह करण्यासाठी google च्या Password Manager चा वापर करू शकता. हे पासवर्ड Save कसे करायचे याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

अशाप्रकारे Save करा पासवर्ड 

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर गुगल क्रोम ओपन करा त्यात वरच्या बाजू, असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. मेन्यूमधील सेटिंग पर्याय निवडा. पासवर्ड या पर्यायावर क्लिक करा, येथे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुम्ही वापरणाऱ्या वेबसाइट्ची एक लांबलचक यादी दिसेल. यात तुम्ही युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही जर गुगलवर पासवर्ड सेव्ह केलात तर तुम्ही गरजेनुसार चेक करत याचा वापर करू शकता तसेच  हा पासवर्ड तुम्हाला इतर ठिकाणी कॉपी आणि पेस्ट करायचा असल्यास त्याच्या शेजारी दोन स्टॅक केलेल्या icon वप टॅप करा. यामुळे तुमच्या क्लिपबोर्डवर पासवर्ड कॉपी होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.