
कॅस्टेला डे अगुआडा (Castella De Aguada) हा किल्ला मुंबईमध्ये वांद्रे येथे आहे. “कॅस्टेला” हा शब्द पोर्तुगीज भाषेत किल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या “कॅस्टेलो” या शब्दाचा अपभ्रंश आहे. पोर्तुगीजांनी वांद्रे येथे हा किल्ला बांधला होता. त्या वेळी ते या किल्ल्याल ‘फोर्टे दे बंडोरा’ म्हणजेच वांद्रे किल्ला असं म्हणत होते. हा किल्ला वांद्रे इथल्या लँड्स एंड येथे स्थित आहे. १६४० साली पोर्तुगीजांनी माहिम खाडी, अरबी समुद्र आणि माहिमच्या दक्षिणेकडच्या बेटाकडे पाहणारा वॉचटावर म्हणून हा किल्ला बांधला होता. त्यानंतर १६६१ साली पोर्तुगीजांनी वांद्रेच्या दक्षिणेकडची मुंबईची सात बेटं इंग्रजांना दिल्यानंतर या किल्ल्याचं धोरणात्मक मूल्य वाढलं.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर म्हणजेच ७९ फूट एवढ्या उंचीवर वसलेला आहे. कॅस्टेला डे अगुआडा (Castella De Aguada) येथे दिल चाहता है (Dil Chahta Hai) आणि बुड्ढा मिल गया (Buddha Mil Gaya) सारख्या अनेक हिंदी चित्रपटांचं शूटिंग करण्यात आलं होतं.
(हेही वाचा – BMC School : खासगी संस्थांना दिलेल्या शाळा ताब्यात घ्याव्यात; मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवला निष्कर्ष)
कॅस्टेला डे अगुआडाचा इतिहास
१५३४ साली गुजरातच्या बहादूर शाहचा (Bahadur Shah) पराभव केल्यानंतर पोर्तुगीजांनी या भागात त्यांचा तळ स्थापन केला होता. त्यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ले बांधले. कॅस्टेला डे अगुआडा (Castella De Aguada) हा त्यांपैकीच एक किल्ला होता. या किल्ल्यावरून दक्षिणेला माहीमची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला वरळीची बेटं आणि नैऋत्येला माहीम शहराकडे लक्ष ठेवलं जात होतं. तसंच हा किल्ला मुंबई बंदराकडे जाणाऱ्या उत्तरेकडच्या सागरी मार्गाचं रक्षण करत असे.
पोर्तुगीज राजवटीमध्ये संरक्षणासाठी या किल्ल्यावर सात तोफा आणि इतर लहान तोफा होत्या. जवळच्याच गोड्या पाण्याच्या झऱ्यातून जहाजांना पिण्याचे पाणी दिलं जायचं. त्यामुळे या किल्ल्याला अगुआडा म्हणजेच कारंजे असं नाव दिलं गेलं.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांचा पराभव होणार असल्याचं लक्षात येताच ब्रिटिशांनी सावधगिरीचा उपाय म्हणून हा किल्ला अंशतः पाडला. तरी १७३९ साली मराठ्यांनी या बेटावर आक्रमण केलं. १७७४ सालापर्यंत मराठ्यांनी त्यावर राज्य केलं. त्यानंतर पहिल्या अँग्लो-मराठा युद्धात ब्रिटिशांनी या भागाचा ताबा घेतला. १८३० साली ब्रिटिशांनी सालसेट बेटाचा मोठा भाग ज्यात लँड्स एंडचाही समावेश होता, तो बायरामजी जीजीभॉय यांना दान केला. त्यानंतर जीजीभॉयने किल्ला असलेल्या टेकडीवर आपलं निवासस्थान वसवलं आणि केपचं नाव बायरामजी जीजीभॉय पॉइंट असं ठेवलं गेलं.
(हेही वाचा – BMC : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १६ किलोमीटरचा रस्ता स्वच्छ; २५ टन राडारोडा, ४ टन कचरा काढला)
कॅस्टेला डे अगुआडाचं संवर्धन
२००३ साली वांद्रे बँड स्टँड रेसिडेंट्स ट्रस्टने किल्ला वाचवण्यासाठी एक संवर्धन कार्यक्रम सुरू केला. स्थानिक खासदार शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्याच्या एका प्रवेशद्वाराची विटांची कमान आणि भरती-ओहोटीच्या धोक्यात असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचा पाया दुरुस्त करण्यात आला होता. जवळच असलेलं ताज लँड्स एंड हॉटेल हे या किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी घेतं. कारण तो त्यांना त्यांच्या मागील मालकांकडून वारशाने मिळाला आहे.
हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI च्या मालकीचा आहे. किल्ल्याच्या पुनर्बांधणीमध्ये नैसर्गिक खडकांच्या रचनेचं जतन, मार्ग प्रदान करणे आणि अँफीथिएटरची निर्मिती समाविष्ट आहे. या पुनर्बांधणीचे शिल्पकार पी.के. दास होते. त्यांनी यापूर्वी कार्टर रोड या क्षेत्राची पुनर्बांधणी केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community