Castrol India Share Price : कॅस्ट्रॉल इंडिया शेअरमध्ये एका आठवड्यात १२ टक्क्यांची उसळी का आलीय

Castrol India Share Price : कॅस्ट्रॉल हा सध्या चर्चेत असलेला शेअर आहे.

51
Castrol India Share Price : कॅस्ट्रॉल इंडिया शेअरमध्ये एका आठवड्यात १२ टक्क्यांची उसळी का आलीय
Castrol India Share Price : कॅस्ट्रॉल इंडिया शेअरमध्ये एका आठवड्यात १२ टक्क्यांची उसळी का आलीय
  • ऋजुता लुकतुके

शुक्रवारचा एक अपवाद सोडला तर कॅस्ट्रॉल इंडियाचा शेअर हा आठवडाभर खूप चांगली कामगिरी करत आहे. गुरुवारपर्यंत शेअर चांगला १८ टक्के वर होता. मागच्या महिन्याभराचा आढावा घेतला तर हा शेअर १७० रुपयांवरून आताच्या २४० रुपयांवर पोहोचला आहे. कॅस्ट्रॉल इंडिया कंपनी ब्रिटिश पेट्रोलियमच्या अखत्यारीत येते. ही कंपनी इंधनाबरोबर लागणारं तेल, ग्रीझ, ट्रान्समिशन फ्लुईड अशी उत्पादनं बनवते. आता अलीकडच्या काळात कॅस्ट्रॉल इंडियाचा शेअर हा वाढतो आहे याचा आढावा घेऊया,

६ मार्चच्या दिवशी एकाच सत्रात कॅस्ट्रॉल शेअरमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली. याला कारण कंपनीसंबंधी आलेली एक बातमी होती. सौदी अरामको ही जागतिक दर्जाची इंधन कंपनी ब्रिटिश पेट्रोलिअमच्या इंधन तेल उत्पादनांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची बातमी आली आणि या शेअरचं रुपडंच पालटलं. ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, सौदी अरामकोचा तसा विचार सुरू आहे. ते आपल्या वोल्वोलाईन या इंधन तेल कंपनीमध्येच कॅस्ट्रॉल इंडिया कंपनी सामील करून घेऊ इच्छितात. वोल्वोलाईन कंपनी सौदी अरामकोनं २.६५ अब्ज अमेरिकन डॉलर (American Dollar) देऊन खरेदी केली होती. आता तसाच व्यवहार कॅस्ट्रॉल इंडियाबरोबर होण्याच्या शक्यतेनं कॅस्ट्रॉलकडे गुंतवणूकदारांचं लक्ष गेलं. शुक्रवारी शेअर नफारुपी विक्रीमुळे २.७५ टक्क्यांनी खाली आला. पण, एरवी महिनाभरात शेअरमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. (Castrol India Share Price)

(हेही वाचा – International Women’s Day : समाजासाठी काम करणे हाच माझा आनंद !; पोलीस उपायुक्त आर. रागसुधा)

WhatsApp Image 2025 03 08 at 9.11.05 AM

कंपनीचे डिसेंबर महिन्याचे तिमाही आकडेही चांगले आहेत. आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत कॅस्ट्रॉल इंडियाने १२ टक्क्यांचा नफा नोंदवला आहे. कंपनीने या तिमाहीत २.७ अब्ज रुपयांचा नफा कमावला आहे. तर कंपनीच्या महसूलातही ७.१ टक्क्यांची वाढ होउन तो १३.५ अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. अलीकडेच कंपनीला १२५ वर्षं पूर्ण झाली. ते निमित्त साधून कंपनीने गुंतवणूकदारांना ९.५ रुपयांचा विशेष लांभांश एका शेअरमागे देऊ केला. या सगळ्या गोष्टींमुळे या शेअरविषयी भारतीय बाजारां सकारात्मक चित्र आहे. (Castrol India Share Price)

(हेही वाचा – राज्याच्या समृद्ध वारशात महिलांचे मोठे योगदान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या Women’s Day च्या शुभेच्छा)

भारतीय बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चलती असली आणि सर्व कंपन्या या गाड्यांकडे वळत असल्या तरीही इंधन तेलाची गरज कंपन्यांना आणि ग्राहकांना लागणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे २०३० पर्यंत इंधन तेलाची बाजारपेठ चढीच असेल असा अंदाज आहे. त्यामुळेही कॅस्ट्रॉलचा शेअऱ तेजीत आहे. (Castrol India Share Price)

कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले तेव्हाच मोतीलाल ओस्वाल, शेअरखान या संशोधन कंपन्यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तर आयसीआयसीआय डिरेक्ट आणि आयडीबीआय कॅपिटल या कंपन्यांनी शेअर कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (Castrol India Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमपूर्ण आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट वाचकांना कुठल्याही शेअरवर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.