Google Chrome वापरणा-यांना सरकारने दिली धोक्याची सूचना, त्वरित करा हे काम

162

Google Chrome या सर्च इंजिनचा करोडो युजर्स वापर करतात. त्यामुळे Google Chrome Browser हा अत्यंत लोकप्रिय आहे. पण गुगल क्रोमचा वापर करणा-यांसाठी आता केंद्र सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या Indian Computer Emergency Response Team(CERT-In) या एजन्सीने गुगल क्रोममधील त्रुटी सांगितल्या आहेत. गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणा-यांना धोका असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे.

जुने व्हर्जन वापरणा-यांना धोका

Google Chrome मधील त्रुटींमुळे रिमोट अटॅकर्स Target System Securityचा भंग करू शकतात. यामुळे तुमच्या सिस्टीमवरील पर्सनल डेटा हॅकर्स सहजरित्या चोरू शकतात. Google Chrome चे 104.0.5112.101 आणि त्यापुढील व्हर्जन वापरणा-या युजर्सना याचा फटका बसत नसला तरी यापेक्षा जुने व्हर्जन्स वापरणा-या युजर्सना धोका असल्याचे CERT-In ने म्हटले आहे.

(हेही वाचाः तुमच्या 4G फोनवर 5G सपोर्ट करतं की नाही? असे करा चेक)

व्हर्जन अपडेट करण्याची सूचना

हा धोका लक्षात घेऊन या सरकारी एजन्सीने जुने व्हर्जन वापरणा-या युजर्सना आपले Google Chrome Browser अपडेट करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो, असेही या एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे. FedCM,SwiftShader,ANGLE,Blink,Chrome OS यांसारख्या त्रुटींचा वापर करुन हॅकर्स अटॅक करत असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.