central park thane : एकनाथ शिंदेंनी उभारलेलं ठाण्यातील ग्रँड सेंट्रल पार्क किती मोठे आहे?; काय आहेत सुविधा? 

38
central park thane : एकनाथ शिंदेंनी उभारलेलं ठाण्यातील ग्रँड सेंट्रल पार्क किती मोठे आहे?; काय आहेत सुविधा? 

नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे ठाणे इथे कोलशेत रोडवर असलेलं एक सार्वजनिक उद्यान आहे. हे उद्यान २०.५ एकर एवढ्या मोठ्या विभागावर तयार करण्यात आलं आहे. या सेंट्रल पार्कमध्ये अनेक वेगवेगळ्या थीम असलेली उद्याने आहेत. तसंच तीन एकरचं मोठं तलाव, वॉकस्पेस, सेल्फीसाठी पूल, ४०० मीटर एवढा जॉगिंग ट्रॅक, अँफीथिएटर आणि एक खुली व्यायामशाळा यांसारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे. (central park thane)

नमो ग्रँड सेंट्रल पार्कची पार्श्वभूमी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी २०२४ साली हे उद्यान जनतेसाठी खुलं केलं. या प्रकल्पाचा ९० कोटींचा खर्च कल्पतरू ग्रुपने करण्याचं ठरवलं आहे. (central park thane)

ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत विकसित केलेलं ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ हे न्यू यॉर्कचं ग्रँड सेंट्रल पार्क आणि लंडनचं हाइड पार्क यांसारख्या जगभरातल्या प्रसिद्ध उद्यानांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. (central park thane)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा)

नमो ग्रँड सेंट्रल पार्क इथले वेगवेगळे उपक्रम

नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये ३,५०० पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजातींचा संग्रह आहे. तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांचा आनंद वाढविण्यासाठी या पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये चार थीम पार्क समाविष्ट आहेत. ती पुढीलप्रमाणे… (central park thane)

  • मुघल बाग
  • चिनी उद्यान
  • मोरोक्कन उद्यान
  • जपानी बाग

याव्यतिरिक्त या सेंट्रल पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग यार्ड, टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट, लहान मुलांसाठी खेळाचं साहित्य, योगा आणि ध्यानधारणा करण्यासाठी नियुक्त केलेल्या जागा तसंच एक मोठं खुलं अँफीथिएटर अशा सुविधाही प्रदान करण्यात आल्या आहेत. नमो ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण वातावरणामुळे इथे पक्षांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आकर्षित होण्याची शक्यता वाढते. (central park thane)

नमो ग्रँड सेंट्रल पार्कमधली हिरवीगार झाडं दरवर्षी ८.८४ लाख पौंड ऑक्सिजन निर्माण करण्यास सक्षम आहेत. या सेंट्रल पार्कमध्ये एका वेळी अंदाजे ५००० लोक येऊ शकतात. (central park thane)

(हेही वाचा – Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी)

नमो ग्रँड सेंट्रल पार्कचे नियम
  • सेंट्रल पार्कमध्ये प्रवेश वैध तिकीट खरेदी करून आणि केवळ कामकाजाच्या वेळेतच मिळेल. पर्यटकांनी पार्कमधून बाहेर पडेपर्यंत त्यांचं प्रवेश तिकीट सांभाळून ठेवावं लागतं. त्याच तिकिटावर पुन्हा प्रवेश करण्यास परवानगी नाही.
  • पार्कच्या आत सायकल चालवण्याची परवानगी फक्त १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच आहे.
  • १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांचे पालक सोबत असल्याशिवाय उद्यानात प्रवेश दिला जात नाही.
  • पार्कमध्ये येणार्‍या पर्यटकांनी पार्कच्या आत स्वच्छता राखाणे आवश्यक आहे.
  • पार्कच्या आत खाण्यापिण्याच्या वस्तू, पेये आणि यूज अँड थ्रो म्हणून वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू आणण्यास परवानगी नाही.
  • तुम्ही तुमच्या मुलांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतःच घ्यायची आहे.
  • पार्कमध्ये कुठेही बाहेर कचरा टाकताना आढळणार्‍या कोणालाही ₹५०० दंड आकारला जाईल.
  • पार्कच्या आत कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यास परवानगी नाही.
  • पार्कमध्ये पर्यटकांना लॉन/बेंचवर झोपण्याची परवानगी नाही.
  • झाडांवर चढण्याची परवानगी नाही
  • वन्यजीवांना खाऊ घालू नका किंवा हाताळू नका. ते त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं.
  • पार्कमध्ये जुगार, बेकायदेशीर ड्रग्ज आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. असे बेकायदेशीर कृत्य करताना कोणीही आढळलं तर पार्क ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍यांना त्वरित कळवावे.
  • पार्क ऑपरेटरच्या पूर्वपरवानगीशिवाय पार्कच्या आजूबाजूला आणि आत व्यावसायिक उपक्रम/कार्यक्रम/सादरीकरण?रॅली करण्यास परवानगी नाही.
  • पार्कच्या मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान करणार्‍या पर्यटकांना नुकसानीच्या वास्तविक खर्चानुसार दंड आकारला जाईल आणि घटनेची माहिती स्थानिक अधिकार्‍यांना दिली जाईल.
  • पार्कमध्ये मोठ्याने बोलू नये, घोषणा देऊ नये, स्पीकरवर संगीत वाजवू नये किंवा इतर कोणताही त्रास देऊ नये.
  • पर्यटकांनी इतरांना त्रासदायक अशा कोणत्याही अश्लील कृती/वर्तनात सहभागी होऊ नये.
  • पार्क ऑपरेटरच्या पूर्वपरवानगीशिवाय DSLR कॅमेरा/ड्रोनसह कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण/व्हिडिओग्राफी करण्यास परवानगी नाही.
  • पार्कमध्ये येणार्‍या पर्यटकांना पार्क ऑपरेटर किंवा त्याच्या सहकार्‍यांनी प्रदर्शित केलेले सर्व दिशादर्शक साइनबोर्ड किंवा दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • पार्कमध्ये असणारे कीटक, सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांपासून पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी.
  • पार्कमध्ये किंवा आजूबाजूला कोणत्याही संशयास्पद वस्तू/गतीबद्दल माहिती मिळाल्यावर पर्यटकांनी उद्यानातले ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचार्‍यांना तात्काळ कळवावे.
  • पार्कमध्ये प्रवेशाच्या वेळा, प्रवेश शुल्क आणि पार्कचे नियम पूर्वसूचना न देता बदलण्याचा अधिकार पार्कच्या संचालकांकडे राखीव राहतील.
  • पर्यटकांनी नमूद केलेल्या सूचनांनुसार पार्कमधल्या सर्व सुविधांचा वापर त्यांच्या स्वतःच्या संपूर्ण जोखमीवर, परिणामांवर आणि खर्चावर करावा. पर्यटकांच्या वैयक्तिक वस्तूंचे नुकसान किंवा अपघात/जखम झाल्यास त्यासाठी पार्क ऑपरेटर, त्याचे सहकारी आणि इथले कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत.
  • पार्कमध्ये प्रवेशाच्या वेळी आणि बाहेर पडताना पर्यटक आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा तपासणी करण्याचा अधिकार पार्क ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचार्‍यांना असेल.
  • पार्कच्या आत घडणाऱ्या हालचालींशी/घटनांशी संबंधित कोणत्याही बाबतीत उद्यान संचालक आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
  • पार्कच्या नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकाला पार्कच्या बाहेर काढून टाकण्याचा अधिकार पार्क संचालक आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना आहे.
  • कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, प्रथमोपचार आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कृपया +917700986586 या नंबरवर संपर्क साधा.
  • कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी, अभिप्रायासाठी कृपया +91 7208820740 या नंबरवर संपर्क साधा किंवा [email protected] वर ईमेल करा. (central park thane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.