chapora fort : चापोरा किल्ला प्रसिद्ध का आहे, माहिती आहे का?

34
chapora fort : चापोरा किल्ला प्रसिद्ध का आहे, माहिती आहे का?

चापोरा किल्ला (chapora fort) हे गोव्यातलं सर्वाधिक आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला म्हापसापासून १० किलोमीटर अंतरावर आणि पणजी पासून सुमारे १८ किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे. या भव्य किल्ल्यावरून गोव्याच्या लोकप्रिय वगेटोर बीचचं दृश्य दिसतं. चापोरा किल्ला हा बारदेझ, गोवा येथे चापोरा नदीच्या जवळ उंचावर स्थित आहे.

हा किल्ला आदिल शाहने बांधलेला असून त्याचं नाव शाहपूरा असं होतं. शाहपूरा म्हणजे “शहाचे शहर” होय. हा किल्ला (chapora fort) १७व्या शतकामध्ये वेगवेगळ्या हिंदू शासकांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला होता. १६८३ साली छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर १७४१ साली हा चापोरा किल्ला पोर्तुगीज शासकांच्या ताब्यात गेला. पोर्तुगीजांच्या राजवटीत त्याचा शापोरा किंवा चापोरा (chapora fort) असा अपभ्रंश झाला. चापोरा किल्ला हे आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे.

(हेही वाचा – old delhi railway station : जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनबद्दल या खास गोष्टी माहिती आहेत का?)

चापोरा किल्ल्याचं आर्किटेक्चर

चापोरा किल्ला (chapora fort) अशा एका प्रमुख स्थानावर बांधला गेला आहे, जिथून सर्व दिशांनी निसर्गरम्य दृश्यं दिसतात. या किल्ल्याच्या चारही बाजूंनी खडी उतार आहे. यामुळे एक बाह्य भिंत तयार झाली आहे. या भिंतीमुळे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला तयार झालेली नैसर्गिक तटबंदी ही या किल्ल्याचं संरक्षण करते. या किल्ल्याचा मुख्य गेट लहान, अरुंद आणि खोल आहे. संरक्षणासाठी बुरुजांच्या स्थानांवर तोफेसाठी मोठ्या प्रमाणात एम्बॅशरसह अनियमित अंतर ठेवलं गेलं आहे.

किल्ल्याच्या (chapora fort) आत एकेकाळी चर्च होतं. या किल्ल्यावर एक मोकळं कुरण आहे. या कुरणावर अनेक शेळ्यांचे कळप चरायला येतात. तसंच या भागावर काजूची झुडुपेही वाढलेली आहेत.

(हेही वाचा – Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर – गौतम गंभीर )

चापोरा किल्ल्याची लोकप्रियता

चापोरा किल्ल्यावर (chapora fort) ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर हा किल्ला अधिकच लोकप्रिय झाला. आता तर चापोरा किल्ला हा गोव्याचं प्रमुख आकर्षण केंद्र बनला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.