ChatGPT : चॅट जीपीटी नेमकं वापरायचं कसं? चॅटजीपीटीचं गाईड

ChatGPT : चॅट जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉक्स आहे.

49
ChatGPT : चॅट जीपीटी नेमकं वापरायचं कसं? चॅटजीपीटीचं गाईड
  • ऋजुता लुकतुके

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ओपन एआय कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आपलं सर्च इंजिन ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलं. चॅट जीपीटी हे त्याचं नाव आहे. त्यामुळे सर्चच्या बाबतीत गेली काही दशकं आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीच्या वर्चस्वाला काहीसा धक्का बसला आहे. सुरुवातीला फक्त नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेली ही सेवा आता सर्वांसाठी खुली आहे. तिची स्पर्धा थेट गुगलशी असणार आहे. (ChatGPT)

विशेष म्हणजे हे फक्त सर्च इंजिन नाही. तर त्यामुळे नवनिर्मितीही करतं. म्हणजे तुम्हाला काय हवंय हे चॅटबॉटला सांगितलंत तर ते लेखी काम तुम्हाला काही सेकंदांत करून मिळेल. म्हणजे एखादं पत्र लिहायचं असेल तर तुम्ही नेमक्या सूचना दिल्यावर चॅटबॉट तुम्हाला पत्रच लिहून देऊ शकेल. किंवा एखादं सादरीकरण तयार करायचं असेल तर तेही तुम्हाला लिहून मिळेल. अगदी कविता रचण्याचं कामही हा चॅटबॉट बिनदिक्कत करतो. त्यामुळे चॅट जीपीटी अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. (ChatGPT)

(हेही वाचा – Exam : स्थगित दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची परीक्षा येत्या १३ आणि १४ मे २०२५ रोजी होणार)

गुगलनेही आपला जेमिनाय प्रोग्राम आता विकसित करायला घेतला आहे. तर फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या टेक कंपन्यांही या क्षेत्रात काम करत आहेत. चॅट जीपीटी कसं वापरायचं ते आता बघूया,

इंटरनेट कनेक्शन असलेला संगणक किंवा स्मार्टफोन तुमच्याकडे असेल तर चॅट जीपीटी सध्या तुम्हाला मोफतही वापरता येईल. एकतर तुम्ही www.chatgpt.com या वेबसाईटवर जाऊ शकता. किंवा हे ॲप तुम्हाला फोन किंवा संगणकावर डाऊनलोड करावं लागेल. ॲपच्या तुलनेत वेब ब्राऊझरवर सुविधा जास्त आहेत.

तुम्ही चॅट जीपीटीचं खातं उघडलं नाहीत तरी चालेल. पण, ते उघडलंत आणि त्यात मोफत किंवा पैसे देऊन खातं सुरू केलंत तर तुम्हाला अधिकच्या सुविधा मिळू शकतील. आता चॅटजीपीटी कसं वापरायचं ते पाहू :

तुम्ही साईन अप केलेलं असेल तर तुमचा ईमेल आयडी टाकून तुम्हाला आधी लॉग इन करावं लागेल. त्यानंतर खालील पायऱ्या पूर्ण करा. (ChatGPT)

(हेही वाचा – Gemini AI : जेमिनी एआय कसं वापरायचं? जेमिनी एआय वापरण्याचं गाईड)

१. चॅट जीपीटीच्या वेबसाईटवर जा – https://chatgpt.com/

२. तिथे तिथे पानावर मधोमध तुम्हाला एक सर्च विंडो दिसेल. त्यावर ask anything असं लिहिलं असेल. तिथे तुम्हाला चॅट जीपीटीची ज्या गोष्टीसाठी मदत हवी आहे ते अगदी थोडक्यात पण, मुद्देसूद लिहा.

३. उदा. तुम्हाला पत्र लिहून घ्यायचं असेल तर ‘पत्र लिहायला मला मदत करा,’ असं लिहिलंत तरी हा चॅटबॉक्स तुम्हाला काही प्रश्न विचारून तुमच्याकडून पत्रासाठी आवश्यक मजकूर काढून घेतो. त्याच्या प्रश्नाला उत्तरं दिलीत तरी तो तुम्हाल हवं असलेलं काम करून देतो. तुम्ही चॅटबॉटला देत असलेल्या सूचना नेमक्या असतील असं बघा.

४. काही सेकंदांत तुम्हाला तुमचं पत्र लिहून मिळेल. त्यातील व्याकरण आणि शुद्धलेखनही तुम्ही तपासण्याची विनंती चॅटजीपीटीला करू शकता.

५. तुम्ही चॅटबॉटशी साधलेला संवाद हा लिखित किंवा व्हॉईस कमांडनेही होऊ शकतो. (ChatGPT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.