chaturbhuj temple : ओरछा येथील चतुर्भुज मंदिराबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!

119
chaturbhuj temple : ओरछा येथील चतुर्भुज मंदिराबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!
ओरछा इथल्या चतुर्भुज मंदिराचं वैशिष्ट्य

भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातल्या ओरछा इथे असलेलं चतुर्भुज मंदिर (chaturbhuj temple) हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं मंदिर आहे. या मंदिराची रचना एखाद्या भव्य बहुमजली वाड्यासारखी आणि आकर्षक आहे.

हे मंदिर मुख्यत्वे रामाच्या प्रतिमेला समोर ठेऊन त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखं आचरण सामान्य जनतेनेही करावं यासाठी बांधलं गेलं होतं. मुख्य देवता म्हणून या मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली गेली होती. पण सध्या या मंदिरात राधा-कृष्णाच्या प्रतिमेची पूजा करण्यात येते. हे चतुर्भुज मंदिर ३४४ फूट उंच आहे. हे मंदिर सर्वांत उंच असलेल्या हिंदू मंदिरांपैकी सर्वात उंच मंदिर आहे.

(हेही वाचा – Assembly Elections : मतदाराला मोबाईल क्रमांक मतदार यादीसोबत जोडण्याची सुविधा)

हे चतुर्भुज मंदिर कुठे आहे?

हे मंदिर मध्य प्रदेशातल्या ओरछा नावाच्या गावात आहे. ओरछा इथल्या किल्ल्यांच्या रांगा संपल्यावर असणाऱ्या राम राजा मंदिराच्या दक्षिण बाजूला आहे. हे चतुर्भुज मंदिर (chaturbhuj temple) बेटवा नदीमधल्या एक बेटावर आहे.

ग्वाल्हेरच्या विमानतळावरून ओरछा येथे जाता येतं. ग्वाल्हेर ते ओरछा मधलं अंतर हे ११९ किलोमीटर म्हणजेच ७४ मैल एवढं आहे. दिल्ली आणि भोपाळ इथल्या विमानतळावरून ग्वाल्हेर इथे नियमितपणे विमानांची उड्डाणे सुरू असतात. तसंच झाशी-खजुराहो या महामार्गाच्या एका वळणावरून रस्त्यानेही येथे जाता येतं. ओरछा इथे पोहोचण्यासाठी झाशी हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन ओरछा पासून १६ किलोमीटर म्हणजेच ९.९ एवढ्या अंतरावर आहे.

(हेही वाचा – ‘Ladki Bahin’ योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकार करणार तब्बल २०० कोटी रुपये खर्च)

चतुर्भुज मंदिराचा इतिहास

हे मंदिर ओरछा राज्यातल्या बुंदेला राजपूतांनी बांधलेलं होतं. या मंदिराचं बांधकाम मधुकर शहा यांनी सुरू केलं होतं आणि १६व्या शतकामध्ये त्यांचा मुलगा वीरसिंग देव यांनी त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. मधुकर शहाने आपली पत्नी राणी गणेशकुवारी हिच्यासाठी ते मंदिर बांधलं होतं. असं म्हटलं जातं की, राणीला स्वप्न-दृष्टांत देऊन प्रभू श्रीरामाने मंदिर बांधण्याचे संकेत दिले होते. राणीने श्रीरामांची तशी इच्छा आहे हे सांगितल्यावर हे चतुर्भुज मंदिर बांधण्यात आलं.

मधुकर शहा हे कृष्णाचे भक्त होते. त्यांच्या पत्नी प्रभू श्रीरामांची भक्ती करायच्या. चतुर्भुज मंदिर (chaturbhuj temple) बांधण्यासाठी राजाची परवानगी मिळाल्यानंतर राणी मंदिरात स्थापना करण्यासाठी अयोध्येला प्रभू रामाची मूर्ती आणायला गेली. ही प्रतिमा नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मंदिरात स्थापन केली जाणार होती.

त्या अयोध्येहून श्रीरामाची मूर्ती घेऊन आल्या तेव्हा सुरुवातीला त्यांनी ती मूर्ती आपल्या राणी महालात ठेवली. कारण त्यावेळी चतुर्भुज मंदिराचं (chaturbhuj temple) बांधकाम सुरू होतं. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी चतुर्भुज मंदिरात स्थापनेसाठी देवाची मूर्ती इथून न्यावी लागणार, या भीतीने आपल्या राणी महलातून ती मूर्ती हलवण्यास नकार दिला. त्यामुळे असं झालं की, चतुर्भुज मंदिराऐवजी रामाची मूर्ती राणी महालातच राहिली. त्यामुळे चतुर्भुज मंदिराचा गाभारा रिकामाच राहिला. पण राणी महालात रामाची पूजा केली गेली त्यामुळे त्या राणी महालाचं रूपांतर राम राजा मंदिरात झाले. भारतातलं हे एकमेव मंदिर आहे जिथे रामाची पूजा राजा म्हणून करण्यात येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.