Jio Recharge Plan : रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, आता खर्च करावे लागणार ‘इतके’ रुपये

आता स्वस्त प्लॅनसाठी वापरकर्त्यांना १४९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

168
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, आता खर्च करावे लागणार 'इतके' रुपये
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, आता खर्च करावे लागणार 'इतके' रुपये

रिलायन्स जिओचा ११९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आतापर्यंत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन होता. कंपनीने हा प्लॅन बंद करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता स्वस्त प्लॅनसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. ११९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळत होत्या. यामध्ये कंपनी ग्राहकांना एकूण १४ दिवसांची वैधता देत असे. दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येत होता. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध होते. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळत होता.

(हेही वाचा – Mumbai Milk Price : मुंबईकरांना आता दुधाचा चटका ; सुट्या दुधाच्या दरात होणार ‘इतकी’ वाढ)

आता स्वस्त प्लॅनसाठी किती खर्च करावा लागेल ?

आता स्वस्त प्लॅनसाठी वापरकर्त्यांना १४९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. ११९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा कमी डेटा देत असला, तरी त्याची वैधता अधिक आहे. १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० दिवसांची वैधता मिळते.

सध्याच्या काळात इंटरनेट ची आवश्यकता प्रत्येकाला असते. आतापर्यंत रिलायन्स जिओचे अनेक प्लॅन सामान्यांना परवडणारे असल्यामुळे अनेकांनी रिलायन्स जिओला (Jio Recharge Plan) प्राधान्य दिले आहे. असे असताना आता किमान रिचार्ज प्लॅनच्या किमतीत बदल केल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.