फक्त १२ अंकी आधार कार्ड क्रमांकाद्वारे असा चेक करा तुमचा बॅंक बॅलन्स

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र समजले जाते. केंद्र सरकारची संस्था UIDAI द्वारे आधार कार्ड जारी केले जाते. आधार कार्डमध्ये प्रत्येक नागरिकाचे नाव, जन्मतारीख, बायोमॅट्रिक तपशील नोंदवला जातो. आधार कार्ड क्रमांकाद्वारे तुमचा बॅंक बॅलन्स सुद्धा तुम्ही तपासू शकता, तुम्हाला बॅंकेचा खाते क्रमांकाची सुद्धा गरज नाही. यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया तुम्हाला फॉलो करावी लागेल.

( हेही वाचा : नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही)

असा चेक करा आधार कार्डद्वारे बँक बॅलन्स

आधारचा वापर बॅंक खाते उघडण्यापासून, आयकर रिटर्न भरणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रवास करताना, सरकारी कामकाजासाठी, आयआरसीटीद्वारे तिकीट काढताना अशा विविध कामांसाठी केला जातो. आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करणे सुद्धा आवश्यक आहे. फक्त १२ अंकी आधार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती घेऊ शकता.

इंटरनेट नसताना आणि स्मार्टफोनचा जास्त वापर करत नाही त्यांच्यासाठी आधारद्वारे बॅंक खात्याचे तपशील जाणून घेणे खूप फायदेशीर आहे. बॅंक बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून *99*99*1# वर कॉल करा. यानंतर तुम्हाला १२ अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल यानंतर या क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा आधार क्रमांक टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला UIDAI कडून संदेश येईल यामध्ये तुम्ही बॅंक बॅलन्स सहज तपासू शकता. आधार कार्डचा वापर पैसे पाठवणे, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी UIDAI ने देशातील ५३ प्रमुख शहरांमध्ये एकूण ११४ आधार सेवा केंद्र उघडण्याची योजना तयार केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here