असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
राजा मंगळवेढेकर यांचं हे सुंदर गीत प्रत्येकाने लहानपणी ऐकलेलं असेल. त्यामुळे चॉकलेटचा बंगला अस्तित्वात नसला तरी या काल्पनिक चॉकलेटच्या बंगल्यात आपण मनाने राहिलेलो आहोत. आता सोशल मीडियावर चॉकलेटच्या डायनासोरची चर्चा आहे. मात्र हा डायनासोर काल्पनिक नसून खरोखरच निर्माण करण्यात आला आहे.
एका पेस्ट्री शेफने चॉकलेटपासून डायनासोरची निर्मिती केली. अमोरी गुइचोन असं या शेफचं नाव असून त्याने साकारलेल्या अद्भूत कलेसाठी त्याला वापरकर्त्यांची वाह वाह मिळाली आहे. अमोरी गुइचोन हा उत्कृष्ट कलाकार आहे. चॉकलेट केक बनवण्यात त्याचं पांडित्य आहे.
आम्ही आता जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तो पाहून तुम्ही अवाक व्हाल. त्याने हा व्हिडिओ यूट्यूब आणि इन्स्टावर अपलोड केला आहे. व्हिडिओ पाहताना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की चॉकलेटचा एवढा मोठा पुतळा कसा तयार होऊ शकतो!
चॉकलेटचा डायनासोर इथे पाहा:
https://www.instagram.com/reel/CoU6HzPJNk1/?utm_source=ig_embed&ig_rid=7db41bb7-dc28-42dc-b079-c79e0f8a75d3
या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे १० मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओत हळूहळू साकार होणारा डायनासोर पाहून सोशल मीडियावरील वापरकर्ते तर या अद्भूत कलाकाराच्या प्रेमात पडले आहेत. तुम्हालाही त्याची ही भन्नाट कलाकृती आवडली आहे ना?
Join Our WhatsApp Community