chhaava release date : छावा चित्रपटाकडून काय अपेक्षा करावी?

57
chhaava release date : छावा चित्रपटाकडून काय अपेक्षा करावी?

विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग आणि संतोष जुवेकर यांची प्रमूख असलेला ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, छावा हा चित्रपट प्रेक्षकांना मराठा राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घेऊन जातो. हा फक्त एक चित्रपट नाही तर शौर्य, त्याग आणि विश्वासघाताची एक महागाथा आहे. (chhaava release date)

‘छावा’ वित्रपटाची भव्यता, जबरदस्त दृश्ये आणि विकी कौशलची शक्तिशाली शैली यामुळे तो मोठ्या पडद्यावर एक संस्मरणीय अनुभव बनतो. जर तुम्हाला इतिहास, अ‍ॅक्शन आणि बॉलिवूडचा परिपूर्ण मिलाफ आवडत असेल, तर हा चित्रपट नक्कीच पाहा. विकी कौशलची जबरदस्त कामगिरी आणि लक्ष्मण उतेकर यांचे उत्तम दिग्दर्शन यामुळे या चित्रपटातून मराठा शौर्याचा इतिहास जीवंत झाला आहे. (chhaava release date)

(हेही वाचा – New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय)

‘छावा’ मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर, रश्मिका मंदान्ना राणी येसूबाईंच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या तीन प्रमुख पात्रांनी आपले काम चोख केले आहे. तयचबरोबर आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांनी देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक लढाई तुम्हाला अशा युगात घेऊन जाते जिथे धर्म आणि कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. (chhaava release date)

अ‍ॅक्शन सीक्वेन्स ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. लढाईच्या दृश्यांचे दिग्दर्शन इतके परिपूर्ण आहे की प्रत्येक लढाई हुबेहुब समोर घडतेय अशी वाटते. त्याचबरोबर महाराजांचे नियोजन, कल्पकताही लढाईतून दिसते. मराठ्यांच्या गनिमी युद्धाच्या तंत्रे आणि शत्रूंना पराभूत करण्यासाठी त्यांची रणनीती उत्कंठा वाढवते. तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. त्यामुळे इतिहासाची मोडतोड न करता औरंगझेबाची क्रूरता आणि संभाजीराजांची वीरता दाखवणारा हा चित्रपट अवश्य पाहायला हवा. (chhaava release date)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.