chhatrapati shivaji maharaj jayanti : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली जाते?

153
chhatrapati shivaji maharaj jayanti : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली जाते?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या असामान्य कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई आणि त्यांचे प्रशिक्षक दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे चारित्र्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी शिवरायांना लहानपणापासूनच शौर्य आणि न्याय यांसारख्या अनेक मूल्यांचं शिक्षण दिलं.

शिवाजी महाराज मोठे होत असताना, त्यांनी उत्तम लष्करी कौशल्ये आणि कुशल रणनीती आत्मसात केली. त्यांनी रयतेवर अत्याचार करणाऱ्या मुघल आणि आदिल शाही शासकांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या असामान्य धाडसामुळे आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळे महाराज हे जाणता राजा झाले. त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी आणि इतिहासावर असलेला त्यांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांची जयंती साजरी केली जाते. (chhatrapati shivaji maharaj jayanti)

(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून उपान्त्य फेरीत खेळणार)

शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात कोणी केली याविषयी मतभिन्नता आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी हा जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेल्या योगदानावर आणि त्यांच्या गुणांवर भर देऊन जनमानसावर त्यांचा लक्षणीय प्रभाव पाडला.

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीच्या दिवशी लोक शिवाजी महाराजांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या जीवनात प्रेरणा शोधण्यासाठी एकत्र येतात. या दिवशी छत्रपतिंचे स्मरण तर केले जातेच त्याचबरोबर महाराज ज्या मूल्यांसाठी लढत राहिले, जसं की, शौर्य, प्रामाणिकपणा आणि योग्य तत्वांसाठी लढणे हे देखील अधोरेखित केले जाते. (chhatrapati shivaji maharaj jayanti)

(हेही वाचा – Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये पोहोचली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम; होणार जागतिक विक्रम)

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यात झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे एक प्रमुख मराठा सरदार होते. तर त्यांच्या आईसाहेब जिजाबाई या एक धर्मनिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी, महाराजांच्या सुयोग्य संगोपनासाठी आणि अढळ वचनबद्धतेसाठी ओळखल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासूनच नेतृत्व आणि धैर्याचे गुण संपादन करण्यास मदत केली आणि महाराजांचं चारित्र्य घडवलं. त्यांनी महाराजांना आपल्या धर्माचा अभिमान आणि रयतेतल्या लोकांच्या हक्कांचं रक्षण करण्याचे महत्त्व सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आणि विश्वासू सल्लागार दादोजी कोंडदेव होते. ते महाराजांचे प्रेरणा आणि मार्गदर्शनाचे स्रोतही होते. दादाजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना प्रामाणिकपणा, धैर्य आणि धोरणात्मक विचारसरणीचे महत्त्व सांगितलं होतं. त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये आपल्या रयतेप्रती कर्तव्याची भावना आणि न्याय आणि नीतिमत्तेची वचनबद्धता निर्माण केली. (chhatrapati shivaji maharaj jayanti)

(हेही वाचा – New India Co-operative Bank : मुंबईतील ‘या’ बँकेवर RBI ने घातली बंदी ; आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाही)

शिवाजी महाराजांनी त्या काळात मुघल राजवटींद्वारे होणारे अन्याय प्रत्यक्ष पाहिले होते. त्यामुळे जुलूमशाहीविरुद्ध लढण्याचा आणि न्याय्य आणि समतापूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा त्यांचा दृढनिश्चय अधिकच बळकट झाला.

शिवाजी महाराजांमध्ये त्यांचे जन्मजात नेतृत्वगुण अधिकाधिक स्पष्ट होत गेले. त्यांचे लष्करी पराक्रम आणि धोरणात्मक बुद्धिमत्ता यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक मावळ्यांना एकत्र आणलं. निष्ठावंत मावळे आणि समर्थकांच्या साथीने शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. (chhatrapati shivaji maharaj jayanti)

(हेही वाचा – कॅन्सरच्या उपचारांवर CM Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा)

मराठा साम्राज्याची निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फक्त बाह्य अत्याचाराचा प्रतिकार करण्यापुरताच नव्हता. तर त्यांना एक हिंदवी साम्राज्य स्थापन करायचं होतं. जे धर्माचंही रक्षण करेल. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देत असताना शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी भारतीय इतिहासातल्या सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा पाया रचला.

शिवाजी महाराजांचं राज्य हे त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व आणि लष्करी पराक्रमासोबतच मावळ्यांच्या साथीने वेगाने विस्तारायला लागलं. महाराजांच्या धोरणात्मक विजयांमध्ये महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकचे काही भाग आणि सध्याच्या दक्षिण भारतातल्या महत्त्वपूर्ण भागांसह विस्तीर्ण प्रदेशांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य उत्तरेकडच्या रामनगरपासून दक्षिणेकडच्या कारवारपर्यंत, पूर्वेकडे असलेल्या बागलाणा ते पश्चिमेकडच्या कानडा प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं. महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा जपलेला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत, मराठा साम्राज्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भरभराटीला आलं. त्यांनी व्यापार, वाणिज्य आणि शेतीला चालना देण्यासाठी, समृद्धी आणि विकासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रगतीशील धोरणे राबवली. किल्ले, रस्ते आणि सिंचन व्यवस्था बांधल्या. (chhatrapati shivaji maharaj jayanti)

(हेही वाचा – RCB New Captain : विराट कोहलीच्या नकारानंतर रजत पाटीदार बंगळुरूचा नवीन कर्णधार)

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली जाते?

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे शाळा, महाविद्यालये आणि सामुदायिक केंद्रांमध्ये विशेष कार्यक्रम आणि मेळावे आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये बहुतेकदा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाषण देतात, विद्यार्थी वादविवादात भाग घेतात आणि शिवाजी महाराजांचे जीवन, कामगिरी आणि वारसा यावर लक्ष केंद्रित करून निबंध स्पर्धांमध्येही भाग घेतात. विद्यार्थ्यांना आणि सहभागींना शिवाजी महाराजांनी साकारलेल्या शौर्य, नेतृत्व आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चिंतन करण्यास आणि त्यांच्या असामान्य कार्यांपासून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केलं जातं. त्याचबरोबर ठिकठिकाणी जागरुकता निर्माण करुनही महाराजांची जयंती साजरी केली जाते.  (chhatrapati shivaji maharaj jayanti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.