भारतात वनवासी समाजामध्ये अनेक प्रकारच्या प्रथा व परंपरा आहेत, ज्या आपल्यासारख्या प्रस्थापित समाजाला विचित्र वाटतात. परंतु त्या सामाजासाठी मात्र तो श्रद्धेचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. भारतीय समाज हा प्राचीन काळापासून अग्निपूजक मानला गेला आहे. आपल्याकडे लग्न लागताना देखील अग्नीला वंदन करुन आपला विवाह संपन्न होतो. परंतु छत्तीसगडमध्ये एका वनवासी समाजात पाण्याला वंदन करुन विवाह संपन्न केला जातो.
भारतीय समाज हा अग्निपूजक आहे. इतर सणांमध्ये विशेषतः दिवाळीमध्ये आपण पणत्या लावतो. सकाळ संध्याकाळ दिवा लावतो. कोणतंही कार्य असो अग्नीला समोर ठेवूनच आपण करतो. परंतु छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात एक असा समाज आहे ज्यांच्यासाठी अग्नीपेक्षा पाणी महत्वाचे आहे. ते जलपूजक आहेत. खरं पाहता वनवासी समाज हा जल, वन आणि भूमीपूजक आहे. बस्तर जिल्ह्यातल्या या वनवासी समाजाला धुरवा म्हणतात आणि यांच्यासाठी जल खूप महत्वाचे आहे.
(हेही वाचा कोण संजय राऊत, मी ओळखत नाही; प्रकाश आंबेडकर पुन्हा गरजले)
अनेक काळापासून त्यांच्याकडे ही प्रथा चालत आलेली आहे. ते पाण्याला केवळ जीवन नव्हे तर देवता मानतात. महत्वाचं म्हणजे हे पाणी बस्तरमधील कांकेरी नदीचं असणं आवश्यक आहे. या नदीला धुरवा समाजात महत्वाचं स्थान आहे, ते या नदीला पवित्र मानतात. कोणतंही शुभ कार्य असो, या कांकेरी नदीच्या पाण्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही असा इथल्या लोकांचा समज आहे.
आपल्याकडे लग्न लागताना अग्नी भोवती सात फेरे घेतल्यानंतरच लग्न संपन्न होतं. मात्र इथली प्रथा अगदीच निराळी आहे. इथे देखील सप्तपदीला महत्व आहे. पण नवरा-नवरीला गावाला सात प्रदक्षिणा घालाव्या लागतात, त्यानंतरच लग्न संपन्न झालं असं मानलं जातं. हा वनवासी समाज असल्यामुळे कुणीही प्रथा मोडू शकत नाही. प्रथा मोडणार्याच्या विरोधात कठोर पावले उचलली जातात. परंतु एका बाबतीत मात्र हा समाज पुढारलेला आहे की इथे हुंडा प्रथा चालत नाही.
Join Our WhatsApp Community