
चिया सिड्स या साल्व्हिया हिस्पॅनिका या वनस्पतीमधल्या लहान बिया असतात. या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक सत्व असते. या पौष्टिक चिया सिड्स बिया शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या बियांना स्मूदी, पुडिंग किंवा हेल्थ ड्रिंकचा भाग म्हणून तुमच्या आहारात समाविष्ट करता येतं. चिया सिड्स या आरोग्यासाठी आश्चर्यकारकरित्या काम करतात. चिया सिड्सचे अविश्वसनीय आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की, (chia seeds benefits)
काय आहेत चिया सिड्सचे टॉप ५ फायदे?
१. पोषक घटकांचा समृद्ध स्रोत
चिया सिड्स या शारीरिक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचं पॉवरहाऊस आहेत. या बियांमध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड तसंच वेगवेगळी जीवनसत्त्वं आणि खनिजांचे अद्वितीय गुणधर्म असतात. या बियांच्या २८ ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये : (chia seeds benefits)
- फायबर : ११ ग्रॅम
- प्रथिने : ४ ग्रॅम
- ओमेगा-३ फॅटी ऍसिड : ५ ग्रॅम
- कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस
हे सर्व पोषक घटक असतात.
हे सर्व घटक शरीरातल्या हाडांचं आरोग्य, स्नायुंची दुरुस्ती आणि शरीरातल्या सर्व पेशींच्या कार्याला अविरतपणे सुरू ठेवण्यात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. (chia seeds benefits)
(हेही वाचा – परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा गुजरात दौरा; परिवहन व्यवस्थेचे केले कौतुक)
२. वजन व्यवस्थापनास मदत करते
चिया सिड्सचा आहारात समावेश केल्यास त्यातल्या उच्च फायबरमुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे इतर बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचा मोह कमी होतो. याशिवाय चिया सिड्सची पाणी शोषण्याची क्षमता पोटामध्ये जेलीसारखा पोत तयार करते. त्याने भूक लवकर शमते. दररोजच्या आहारात किंवा पेयांमध्ये सेंद्रिय चिया सिड्सचा समावेश केला तर वजन नियंत्रण करण्यात प्रभावीपणे मदत होऊ शकते.
३. चयापचय क्रिया सुधारते
चिया सिड्स सेवन करण्याचे फायदे शरीराच्या पचनक्रियेलाही मिळतात. चिया सिड्स मधले विरघळणारे फायबर घटक हे आतड्यांमधल्या जिवाणूंच्याच् वाढीसाठी मदत करतात. हे जीवाणू निरोगी पचनसंस्थेसाठी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त चिया सिड्स आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या शारीरिक समस्या टाळतात. (chia seeds benefits)
४. शरीराच्या उर्जेची पातळी वाढते
चिया सिड्सच्या सेवनाने शारीरिक ऊर्जेची पातळी वाढते. म्हणून एथलिट्स आपल्या नाश्त्यामध्ये चिया सिड्सचंही सेवन करतात. चिया सिड्स हे नैसर्गिक एनर्जी आहे. या सिड्स तुम्ही तुमच्या स्मूदी किंवा एनर्जी बारमध्ये मिसळून घेऊ शकता.
५. हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन देते
चिया सिड्सचा सर्वात चांगला लाभ म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होणारा सकारात्मक परिणाम होय. चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातल्या बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल ची पातळी कमी होते. तर गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल ची पातळी वाढते. यामुळे शरीरात अनुकूल चरबी तयार होते. छातीची जळजळ कमी होऊन रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदय निरोगी राहतं. (chia seeds benefits)
(हेही वाचा – प्रस्तावित ‘Love Jihad’ कायद्याला गृह खात्याच्याच निर्णयाचा अडसर?)
दररोजच्या आहारात चिया सिड्सचा समावेश कसा करायचा?
चिया सिड्सचे उपयोग पुष्कळ आहेत. त्यामुळे त्यांना सुपरफूड्सपैकी एक मानलं जातं. दररोजच्या आहारात चिया सिड्सचा समावेश करण्याचे काही सोपे मार्ग आहेत ते म्हणजे…
- चिया सिड्सचं पुडिंग : बदामाच्या दूधात मध किंवा गूळ आणि चिया सिड्स घालून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर सकाळी मलईदार, चविष्ट नाश्ता तयार करा.
- स्मूदी बूस्टर : तुमच्या आवडत्या फळं किंवा भाज्यांच्या स्मूदीमध्ये एक चमचा चिया सिड्स घालून प्या.
- चिया वॉटर : एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया सिड्स घालून १५ मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर त्यात थोडा लिंबाचा रस घालून तुम्ही रिफ्रेशर म्हणून पिऊ शकता.
- बेकिंग : व्हेगन बेकिंग करताना अंड्याऐवजी चिया सिड्सचा वापर करा. त्यासाठी तीन चमचे पाण्यात एक चमचा चिया सिड्स याप्रमाणे घ्या.
- टॉपिंग्ज : दही, ओटमील किंवा सॅलडवर चिया सिड्स पेरा. (chia seeds benefits)
(हेही वाचा – अद्वैत सिद्धांत मांडणारे Ramakrishna Paramhansa यांचा जीवन परिचय जाणून घ्या !)
ऑरगॅनिक चिया सिड्सचं का वापरायच्या?
ऑरगॅनिक चिया सिड्स वापरल्यामुळे हानिकारक कीटकनाशके आणि रसायनांपासून शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. सेंद्रिय बियाणे असले तर धान्याचा पौष्टिकपणा टिकून राहतो. त्यामुळे त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
चिया सिड्स हे योग्य हेल्थ सप्लिमेंट का आहे?
इतर हेल्थ सप्लिमेंट्स सोबत चिया सिड्सचं कॉम्बिनेशन केलं तर त्या हेल्थ सप्लिमेंट्सचे फायदे वाढतात. उदाहरणार्थ, बायोटिन गमी हे केस आणि नखांच्या वाढीसाठी परिणामकारक आहेत. तर भारतातलं हे मल्टीविटामिन गमी पोषक तत्वांचा विस्तृत स्पेक्ट्रम प्रदान करते. हे एकत्रित करून घेतल्याने सर्वांगीण आरोग्यासाठी संतुलित आहार ठरू शकते.
चिया सिड्सचे अनेक फायदे शरीराला होतात. ज्यांमध्ये पचन सुधारणे, वजन कमी होणे, कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहणे, हृदय आणि मेंदूचे आरोग्य अशा कितीतरी फायद्यांचा समावेश आहे. (chia seeds benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community