chicken biryani recipe : अशी बनवा चिकन बिर्याणी, बोटं चाटत राहाल!

25
chicken biryani recipe : अशी बनवा चिकन बिर्याणी, बोटं चाटत राहाल!

बिर्याणी ही जगभरातल्या सर्वांत लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. चिकन बिर्याणीमध्ये मॅरीनेट केलेलं चिकन, सुवासिक बासमती तांदूळ, खडे मसाले, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, तळलेला कांदा, तळलेले काजू आणि मनुका आणि भरपूर तूप यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश असतो. चिकन बिर्याणी ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येते. त्यांपैकीच एका पद्धतीची आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (chicken biryani recipe)

(हेही वाचा – Bangladeshi infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना तातडीने देशाबाहेर काढा; माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी)

चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

१/२ किलो बासमती तांदूळ, १/२ किलो चिकन, खडा मसाला (१ ते २ तमालपत्र, १ मोठी वेलची, २ लहान वेलची, १ चक्री फुल, ३ ते ४ लवंगा आणि काळी मिरी, १ ते २ दालचिनीचे तुकडे), २०० ग्रॅम दही, १-१/२ टेबल स्पून आले- लसूण पेस्ट, १ टेबल स्पून बिर्याणी मसाला, १-१/२ टेबल स्पून लाल तिखट, १/२ टेबल स्पून गरम मसाला, १/२ टेबल स्पून हळद, १/२ टेबल स्पून धणे पूड, १/२ टेबल स्पून जीरे पूड, २ टेबल स्पून लिंबाचा रस, ६ कांदे, २ टोमॅटो, ७ ते ८ टेबल स्पून तेल, १/२ टेबल स्पून जिरे, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ वाटी पुदिन्याची पानं, २ टेबल स्पून खाण्याचा रंग, ४-५ टेबल स्पून साजूक तूप, चवीनुसार मीठ, १/४ टी स्पून साखर, पाणी इत्यादी. (chicken biryani recipe)

(हेही वाचा – Hindus in Bangladesh : हिंदूंवरील हल्ल्यांच्या ८८ घटना घडल्या; बांगलादेशने दिली कबुली)

कृती

  • बासमती तांदूळ तीन ते चार वेळा धुवून घ्या. त्यानंतर एक तास पाण्यात भिजत ठेवा.
  • चिकन स्वच्छ धुवून त्यात दोनशे ग्रॅम दही, दीड टेबल स्पून आले-लसूण पेस्ट, एक टेबल स्पून बिर्याणी मसाला, दीड टेबल स्पून लाल तिखट, अर्धा टेबल स्पून हळद, अर्धा टेबल स्पून गरम मसाला, आणि एक टेबल स्पून लिंबाचा रस घालून चांगलं एकत्र करावं आणि चिकन दीड तासासाठी मॅरीनेट करण्यासाठी ठेवावं.
  • एका तासानंतर बिर्याणी साठी लागणारा तांदूळ शिजवण्यासाठी गॅस वर एका पातेल्यात चार ते पाच ग्लास पाणी गरम करून त्यात सगळे खडे मसाले घाला. नंतर त्यात थोडं मीठ घाला. पाण्याला उकळी आली की, त्यात भिजवलेला तांदूळ घाला. तांदूळ ८०% शिजवून घ्या. तांदूळ शिजल्यानंतर त्यातलं एक्सट्रा पाणी काढून भात थंड करायला ठेवा.
  • तीन कांदे उभे चिरून घ्या. त्यांना थोडं मीठ आणि साखर लावून कांदा हाथाने कुस्करून मोकळा करून घ्या. दहा मिनिटं कांदा तसाच बाजूला ठेवा. त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून चिरलेला कांदा छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • बिर्याणी साठी लागणारी चिकन ग्रेव्ही शिजवण्यासाठी कढई गॅस वर ठेवून त्यात तेल घाला. तेल गरम झालं कि त्यात अर्धा टेबल स्पून जिरं घाला. नंतर त्यात एक तमालपत्र आणि तीन कांदे बारीक चिरून घाला. कांदा लालसर होईपर्यत छान परतून घ्या. कांदा लालसर झाल्यावर त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो छान मऊ झाले की त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घाला. त्यानंतर त्यात अर्धा टेबल स्पून धणे पूड, अर्धा टेबलस्पून जिरे पूड आणि चिरलेली कोथिंबीर घाला. चिकन मध्ये थोडं पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटं झाकण लावून चिकन शिजवून घ्या.
  • बिर्याणीचे लेअर तयार करण्यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तळाला थोडी शिजवलेली चिकन ग्रेव्ही पसरून घ्या. त्यानंतर त्यावर शिजवून थंड केलेला तांदूळ पसरवा. मग त्यावर तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पसरवा. मग एक टेबल स्पून खाण्याचा रंग आणि तीन टेबल स्पून साजूक तूप घाला. वरून थोडासा बिर्याणी मसाला आणि लिंबू पिळून घ्या. अश्याच प्रकारे दुसरा थरही तयार करून घ्या.
  • बिर्याणीचे थर करून झाले की, त्या पातेल्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर सात ते आठ मिनटं वाफ काढून घ्या. त्यानंतर नंतर गरमागरम बिर्याणी प्लेट मध्ये काढून कांदा आणि लिंबाच्या फोडी सजवून सर्व्ह करा.

टीप : बिर्याणी साठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा. तांदूळ थंड झाला की भात छान मोकळा होतो. (chicken biryani recipe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.