नोकरीच्या शोधात आहात? एका क्लिकवर मिळवा माहिती!

138

शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल, अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील तरुणांना सरकारी योजना आणि राज्यातील उपलब्ध रोजगाराच्या संधींची माहिती देण्यासाठी हे अॅप लाॅंच करण्यात आले आहे.

तरुणांना नोकरीच्या संधीची मिळणार माहिती

याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्य, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सुरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते. या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.

( हेही वाचा: अरेरे… पोटच्या मुलांना जीवंत ठेवण्यासाठी वडिलांना विकावी लागतेय किडनी! )

या ठिकाणी संधी उपलब्ध

आयकर विभाग, महावितरण आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महावितरण, पुणे मध्ये अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन) पदासाठी जागा असून, त्यासाठी पात्रता 10वी पास, ITI अशी आहे. आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकऱ्या उपलब्ध असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर व दहावी पास अशी आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस पदासाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अशी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.