‘चिल अॅट होम’ Sprite कडून मोहिम लाँच

75
'चिल अॅट होम' Sprite कडून मोहिम लाँच

स्‍प्राइट (Sprite), या आयकॉनिक लेमन व लाइम-फ्लेवर्ड पेयाने आपल्‍या नवीन अनोख्या मोहिमेसह व्‍यस्‍त दिवसानंतर ‘चिल अॅट होम’प्रती नवीन पैलू सादर केले आहेत. किशोरवयीन त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात नवनवीन शिकवण घेत अनुभव वाढवण्‍याचा सतत प्रयत्‍न करत आहेत. अभ्‍यास, अभ्‍यासेत्तर क्रियाकलाप, सामाजिक अपेक्षा आणि वैयक्तिक ध्‍येयांमध्‍ये संतुलन राखणे तारेवरची कसरत ठरू शकते. इतरांच्‍या अपेक्षांची पूर्तता करत आणि आसपास असलेल्‍या व्‍यक्‍तींनी ठरवलेल्‍या गोष्‍टी करत दिवस व्‍यतित केला जातो. सायंकाळी घरी परतत असताना देखील ते यासंदर्भातील तणावासह घरी येतात. जीवनातील या कधीच न संपणाऱ्या धावपळीमुळे तरूण पिढीने शांतमय व उत्‍साहवर्धक क्षणांचा आनंद घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. ही गरज ओळखत स्‍प्राइट अल्टिमेट चिल पार्टनर म्‍हणून पुढाकार घेत आहे, तसेच किशोरवयीन तरूणांना दिवसभरातील थकव्‍यानंतर उत्‍साहित होण्‍यासाठी रिफ्रेशिंग ट्विस्‍ट देत आहे.

उभारता सितारा वेदांग रैना असलेली ही मोहिम तरूण पिढीला व्‍यस्‍त दिवसानंतर उत्‍साहित करण्‍याचा प्रयत्‍न करते आणि दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्‍या अपरिहार्य व संभाव्‍य त्रासदायक क्षणांचा सामना केल्‍यानंतर त्‍यामधून आरामदायीपणा मिळण्‍यासाठी पसंतीचे पेय म्‍हणून स्‍प्राइटला (Sprite) सादर करते. या मोहिमेअंतर्गत जाहिरातांची सिरीज लाँच करण्‍यात आली आहे, जी किशोरवयीनांशी त्‍यांचे कॉलेज जीवन, सोशल सर्कल्‍स, मित्र ग्रुप, सामाजिक धमाल इत्‍यादींना एकत्र आणत संलग्‍न होते. कामानंतर विरंगुळाचा शोध घेणारे, रेफ्रिजेरेटर्ससोबत संवाद साधणारे व्‍यक्‍ती आणि विनोदी संवाद हे सर्व मोहिमेच्‍या मूळ उद्देशामध्‍ये भर करतात. ही मोहिम एआयला समाविष्‍ट करत २०० अद्वितीय मॅसेजेस् सादर करते, जे योग्‍य संदर्भ व योग्‍य वेळेसह वितरित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत आणि त्‍यामध्‍ये किशोरवयीनांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्‍या क्षणांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Mahaparinirvan Express : महापरिनिर्वाण एक्स्प्रेसमध्ये काय सुविधा आहेत?)

उभारता सितारा व जनरेशन झेड आयकॉन वेदांग रैना या मोहिमेप्रती आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाला, “मला स्‍प्राइट (Sprite) युनिव्‍हर्सचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आजच्‍या तरूणांच्‍या शांतमय व उत्‍साही स्‍वभावाशी संलग्‍न होणाऱ्या अशा प्रतिष्ठित ब्रँडसोबत काम करण्‍याची उत्‍साहवर्धक संधी आहे. मला यामागील उद्देश पूर्णत: समजला आहे आणि एण्‍ड-ऑफ-डे चिल माझ्यासह आमच्‍या पिढीसाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. स्‍प्राइटची सर्वोत्तम व विलक्षण जाहिरात व्यस्ततेमध्‍ये देखील शांतमय क्षणाचा अनुभव देते. ”या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया आणि साऊथ-वेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या वरिष्‍ठ श्रेणी संचालक सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “दररोज उत्तम कामगिरी करण्‍यासाठी धावपळ केली जाते. दिवसाच्‍या शेवटी, प्रत्‍येक किशोरवयीन आरामदायीपणा क्षणाचा शोध घेतात. पण, ते दिवसभरातील तणाव आणि सामानाने भरलेली बॅग घेऊन घरी परत येतात. सर्जनशील धोरण त्‍यांना उत्‍साहित करण्‍यासाठी या बॅगेचा उत्‍प्रेरक म्‍हणून वापर करते. चिल-अॅट-होम अल्टिमेट रिफ्रेशिंग ड्रिंक स्‍प्राइटचे विलक्षण टेक आहे, जे किशोरवयीनना व्यस्‍त दिवसानंतर उत्‍साहित होण्‍याचे आवाहन करते. वेदांग उत्‍साही वातावरण निर्माण करतो, ज्‍यामुळे तो आजच्‍या किशोरवयीन पिढीशी संलग्‍न होण्‍यासाठी अगदी परिपूर्ण आहे.”

कॉर्केस फिल्‍म्‍सचे डायरेक्‍टर विश्‍वेश कृष्‍णामूर्ती म्‍हणाले, “आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये दिवस कधीच संपत नाही. घरी परतल्‍यानंतर देखील तणावाचा सामना करावा लागतो. यामधून ही जाहिरात डिझाइन करण्‍याला उत्तम प्रेरणा मिळाली आहे. तुम्‍हाला त्रास देणाऱ्या व्‍यक्‍तींना बॅकपॅकमधून बाहेर काढण्‍याचा क्षण निर्माण करणे मजेशीर आव्‍हान होते. स्‍प्राइटमधील विश्‍व रोमांचक पैलूंनी भरलेले आहे जसे फ्रिजशी संवाद साधणे, बॅकपॅक्‍समधून बाहेर पडणाऱ्या व्‍यक्‍ती आणि रूमभोवती झूम होणाऱ्या स्‍प्राइट बॉटल्‍स. हे अद्वितीय व मनोरंजनपूर्ण आहे.”ओगिल्‍व्‍ही इंडिया (नॉर्थ)च्‍या चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर रितू शारदा म्‍हणाल्‍या, “स्‍प्राइटला (Sprite) तरूणांबाबत सखोलपणे माहित आहे. ही जाहिरात कॉलेज विद्यार्थ्‍यांना सामना कराव्‍या लागणाऱ्या दररोजच्‍या त्रस्ततेला कॅप्‍चर करते, जे त्‍यांना बॅकपॅकच्‍या वजनामुळे सहन करावा लागते. यामधून ते दिवसभर सहन करणारा तणाव व भार सादर करण्‍यात आले आहे. स्‍प्राइट उत्‍साहित होण्‍याचा परिपूर्ण मार्ग म्‍हणून पुढाकार घेते, एण्‍ड-ऑफ-डे क्षणांना रिफ्रेशिंग व रिवॉर्डिंग करते.” स्‍प्राइट भारतभरातील किशोरवयीनना त्‍यांच्‍या व्‍यस्‍त जीवनामधून ब्रेक घेण्‍याचे आणि स्‍प्राइटच्‍या रिफ्रेशिंग बॉटलसह ‘चिल अॅट होम’चा आनंद घेण्‍याचे आवाहन करते. दैनंदिन जीवनात तणाव वाढत असताना उत्‍साहित होण्‍याची गरज अधिक महत्त्वाची झाली आहे. दिवसभरातील थकव्‍यानंतर आरामदायी विरंगुळा घेत असाल किंवा शांतमय क्षणाचा आनंद घेत असाल तर स्‍प्राइटचे क्रिस्‍प, लेमन-लाइम फ्लेवर अद्वितीय रिफ्रेशमेंट देते. तर मग तणावाला बाजूला ठेवा, आराम करा आणि स्‍प्राइटसह घरी उत्‍साहीपणाचा आनंद घ्‍या.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.