कोरोनानंतर चीनचा हा आहे नवा गेम…

152

कोरोनासारख्या जीवघेण्या महारोगाचा संपूर्ण जगात प्रसार करुन चीन स्वतः मात्र नामानिराळा राहिला. आता ऑनलाईन गेम्सचा व्हायरस संपूर्ण जगात पसरवून चीनने आपल्या देशात फतवा काढत ऑनलाईन गेम्स खेळण्यावर बंदी घातली आहे.

ऑनलाईन गेमिंगची उलाढाल किती?

चीनने नुकताच एक फतवा काढत ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध आणले आहेत. सरकारी नियमानुसार आता चीनमधील किशोरवयीन मुले आठवड्यातून फक्त तीनच तास ऑनलाईन गेम खेळू शकणार आहेत. किशोरवयीन मुलांची ऑनलाईन गेमिंगमधील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या निमित्ताने गेमिंग उद्योगाची उलाढाल हा विषय ऐरणीवर आला आहे.

मोबाईल गेम मधील सध्याचे कल

  • क्लाऊड गेमींग
  • ब्लॅाक चेन बेस्ड गेम्स
  • ऑग्मेंटेड रिअॅलिटी गेमिंग
  • हायपर कॅज्युअल गेम
  • क्रॉस -प्लॅटफॉर्म प्ले
  • कॉम्पिटिटिव्ह मल्टिप्लेअर मोबाईल गेम्स

जागतिक उलाढाल किती?

2023 पर्यंत ही उलाढाल 30 टक्के वाढण्याची शक्यता
2021- 2 लाख कोटी रुपयांहून अधिक (300 अब्ज डॉलर )
2021-22 या आर्थिक वर्षात भारतामध्ये गेमिंग उद्योगाची उलाढाल 6 हजार कोटी रुपये एवढी होती.

महसूल प्राप्ती कशातून

  1. गेमिंग अॅपवरील जाहिराती
  2. गेमर्सना दिल्या जाणा-या बक्षिसांचे शुल्क
  3. इन-अॅप खरेदी (उदा. नाणे, हिरे,ऊर्जावर्धक पेये इ.)
  4. पेड अॅप्स
  5. इन गेम ब्रँण्ड प्लेसमेंट्स

जागतिक स्तरावरील सांख्यिकी आणि कल

मोबाईल गेम खेळणारे- 51 टक्के
कन्सोल गेम- 25 टक्के
पीसी गेम- 24 टक्के

या ऑनलाईन गेम्सचे चीनचे 58 कोटी गेमर्स असून, त्याची कमाई 36 हजार 540 दशलक्ष डॅालरमध्ये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.