तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये चिंचोटी धबधबा आहे. हा धबधबा मुंबईजवळ असलेल्या सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सुंदर ट्रेक आहे.
चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेकिंग –
चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्याकरिता तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलातून कमीतकमी ६० ते ७० मिनिटं ट्रेक करत जावं लागतं. इथल्या ट्रेकिंगमुळे तुम्हाला जंगल ट्रेकिंगचा सर्वोत्तम अनुभव घेता येईल. तसंच तुम्हाला जंगलाचं सौंदर्य जवळून पाहू शकाल.
तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातला हा ट्रेक चिंचोटी इथे असलेल्या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सोपा आणि हा एकच मार्ग आहे. तसंच दिशानिर्देशांसाठी कोणतेही सूचनाफलक नाहीत. म्हणून इथे जाण्यापूर्वी Google नकाशा डाउनलोड करून घ्या. या नकाशाचा वापर धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी करा. (chinchoti maharashtra)
(हेही वाचा – Ratangad Trek : रतनगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जायचंय? मग हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे)
निसर्ग सौंदर्याने नटलेला चिंचोटी धबधबा –
चिंचोटी धबधब्याचे दृश्य खूप सुंदर आहे. इथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही छान आहे. विशेषतः पावसाळ्यात, पावसाळ्यामुळे या ठिकाणाला स्वर्गीय सौंदर्य मिळतं. पावसाच्या दिवसांत या धबधब्याजवळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या अवतीभवती एक हिरवंगार जग दिसेल. चिंचोटी धबधबा तर खूपच सुंदर दिसतो. त्याच्या पाण्यामुळे एक तलाव तयार होतो. या तलावात तुम्ही पोहू शकता.
चिंचोटी धबधब्यावर करण्यासारख्या रोमहर्षक गोष्टी
ट्रेकिंग –
चिंचोटी धबधब्यापर्यंत करावं लागणारं ट्रेकिंग तुम्हाला घनदाट जंगलातून चालताना थरारक अनुभव देईल. हा सर्वात सोपा ट्रेक आहे. ट्रेकिंगच्या दरम्यान तुम्हाला भरपूर पक्षी पाहायला मिळतील. (chinchoti maharashtra)
फोटोग्राफी –
चिंचोटी धबधब्याजवळ फोटो आणि व्हिडिओ घेऊन तुम्ही सुंदर आठवणी जपून ठेऊ शकता.
एक दिवसीय सहल –
एक दिवसाच्या सहलीसाठी चिंचोटी धबधबा हे एक आदर्श ठिकाण आहे.
पक्षीनिरीक्षण –
चिंचोटी धबधबा हा तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात आहे. इथल्या जंगलात तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती दिसून येतील.
(हेही वाचा – wardha junction बद्दल मिळवा संपूर्ण माहिती, फक्त एका क्लिकवर!)
चिंचोली धबधब्यापर्यंत कसं पोहोचायचं?
चिंचोटी धबधबा हा पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात चिंचोटी नावाच्या गावात आहे. येथे जाण्यासाठी पुढे सांगितलेल्या रेल्वे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनने येऊ शकता. जवळच्या रेल्वे स्टेशनवरून ऑटो रिक्षा घेऊन चिंचोटी गावात पोहोचा. गावातून चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ६० मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. गावापासून धबधबा सुमारे ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा जेवणाचा डबा सोबत न्यावा लागतो. (chinchoti maharashtra)
चिंचोटी धबधब्याला भेट देण्याची उत्तम वेळ –
पावसाळ्याच्या दिवसांत चिंचोटी धबधब्याला भेट देण्याची उत्तम वेळ आहे.
चिंचोटी धबधब्याच्या सर्वांत जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं?
या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांत जवळचं रेल्वे स्टेशन नालासोपारा आणि वसई रोड हे आहे.
नालासोपारा – १४.५ किलोमीटर अंतरावर आहे.
वसई रोड – १४.५ किलोमीटर अंतरावर आहे.
याव्यतिरिक्त जूचंद्र, नायगाव आणि कमान या ठिकाणांवरूनही चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचता येतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community