Chitrakote Waterfalls : भारताचा नायगारा फॉल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्रकोट धबधब्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

51
Chitrakote Waterfalls : भारताचा नायगारा फॉल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्रकोट धबधब्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
Chitrakote Waterfalls : भारताचा नायगारा फॉल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्रकोट धबधब्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

चित्रकोट धबधबा (Chitrakote Waterfalls) हा इंद्रावती नदीवर असलेला एक नैसर्गिक धबधबा आहे. हा धबधबा इंद्रावती इथल्या बस्तरच्या टोपी जिल्ह्यातील जगदलपूरच्या पश्चिमेला अंदाजे ३८ किलोमीटर म्हणजेच २४ मैल एवढ्या अंतरावर आहे. या धबधब्याची उंची सुमारे २९ मीटर म्हणजेच ९५ फूट इतकी आहे. हा भारतातला सर्वात रुंद धबधबा आहे. या धबधब्याची रुंदी पावसाळ्यात जवळपास ३०० मीटर म्हणजेच ९८० फूटांपर्यंत पोहोचते. पावसाळ्यात त्याच्या रुंदीमुळे आणि त्याच्या अर्धगोल आकारामुळे या धबधब्याला “भारताचा नायगारा फॉल्स” असं म्हटलं जातं.

चित्रकोट धबधबा (Chitrakote Waterfalls) ज्या इंद्रावती नदीवर आहे. ती नदी ओडिसाच्या कालाहंडी जिल्ह्यामध्ये उगम पावते. ती विंध्य पर्वताच्या डोंगररांगेमधून पश्चिमेकडे वाहते. त्यानंतर पुढे चित्रकोट येथे धबधब्याचं रूप घेते. मग पुढे २४० मैल एवढं अंतर पार केल्यानंतर शेवटी ती भद्रकाली येथे गोदावरी नदीला मिळते. या धबधब्याला “द स्मॉल नायगारा फॉल्स” असं नाव दिलं गेलं आहे. पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत धबधब्यातल्या धुक्यावर परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांसोबतच सुंदर इंद्रधनुष्य तयार होतात.

(हेही वाचा – Mahakumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस धावणार; असे असेल बसेसचे नियोजन)

चित्रकोट धबधब्याच्या (Chitrakote Waterfalls) डाव्या बाजूला एक लहान शिवमंदिर आहे आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या “पार्वती लेणी” आहे. जगदलपूर इथल्या मैदानी प्रदेशातून वाहून गेल्यामुळे ही नदी धबधब्याच्या वरच्या बाजूला संथपणे वाहते. नदीच्या खोऱ्याच्या या भागापर्यंत फारच कमी जंगल आहे.

धबधब्याच्या खाली ही नदी बोधघाट वनक्षेत्रातून प्रवास करते आणि नदीच्या प्रवाहाच्या स्थितीत मोठा बदल होतो. वायुवीजन प्रक्रिया आणि डाउनस्ट्रीम क्षेत्रातलं जंगल हे नदीतला गाळ फिल्टर करतं. परिसरातल्या वनस्पतींपासून सावली नसल्यामुळे उन्हाळा वगळता या परिसरातील हवामान आल्हाददायक असते.

चित्रकोट धबधबा (Chitrakote Waterfalls) हा कांगर व्हॅली नॅशनल पार्कजवळ असलेल्या दोन धबधब्यांपैकी एक आहे. दुसऱ्या धबधब्याचं नाव तीरथगड धबधबा असं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.