chor bazaar mumbai : तुम्ही चोर बाजारात कधी गेला आहात का? इथे चोर राहतात का? चोर बाजार हे नाव कसं पडलं?

124
chor bazaar mumbai : तुम्ही चोर बाजारात कधी गेला आहात का? इथे चोर राहतात का? चोर बाजार हे नाव कसं पडलं?

चोर बाजार (chor bazaar mumbai) मार्केट हे भारतातल्या सर्वात मोठ्या फ्ली मार्केट्सपैकी एक मार्केट आहे. चोर बाजार इथे पोहोचण्यासाठी दक्षिण मुंबई इथलं ग्रँट रोड या रेल्वे स्टेशनवरून जाता येतं. इथल्या भेंडी बाजार नावाच्या एरियाजवळ असलेल्या मटण स्ट्रीट नावाच्या रस्त्यावर चोर बाजार मार्केट आहे. हे संपूर्ण मार्केट मुंबई इथल्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकीच एक आहे.

मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेमध्ये चोरी करणाऱ्याला चोर असं म्हणतात. मुंबईत फार पूर्वीपासून एक आख्यायिका प्रचलित आहे. त्या आख्यायिकेनुसार, मुंबईत जर तुमची कोणतीही वस्तू चोरीला गेली असेल, तर तुम्ही ती वस्तू चोर बाजारातून पुन्हा विकत घेऊ शकता.

मार्केटला चोर बाजार हे नाव कसं पडलं?

चोर बाजार या नावाचा शब्दशः अर्थ चोरांचा बाजार असा होतो. पण खरंतर या मार्केटचं मूळ नाव शोर बाजार असं होतं. मुंबईतल्या मोहम्मद अली रोडच्या आसपासच्या गजबजलेल्या सगळ्या मार्केट्समध्ये सतत गोंगाटचं असतो. त्यावरून या मार्केटला शोर बाजार असं नाव ठेवलं गेलं.

पण पुढे ब्रिटिश सत्तेच्या राजवटीमध्ये शोर या शब्दाचा व्यवस्थित उच्चार न करता येणाऱ्या ब्रिटीशांनी या मार्केटचा उच्चार चोर बाजार असा केला. तेव्हापासून शोर बाजारचं चोर बाजार (chor bazaar mumbai) असं नाव झालं. शेवटी चोरीच्या वस्तू आणि इतर व्हिंटेज वस्तू या मार्केटमध्ये विकायला येऊ लागल्या आणि या मार्केटचं चोर बाजार हेच नाव कायम राहिलं.

(हेही वाचा – Missed 31st July Deadline : आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?)

चोर बाजाराचा इतिहास

भारतामध्ये ब्रिटीश राजवट आल्यानंतर मुंबई इथला चोर बाजार भारतातला सर्वात मोठा सेकंड-हँड वस्तूंच्या सर्वांत जुन्या मार्केट्सपैकी एक म्हणून गणला जायला लागला. त्यानंतरच्या काळात चोरीच्या वस्तूंपेक्षा अधिकतर सेकेंड हँड वस्तू विकल्या जातात असं दिसून आलं. त्यानंतर हा चोर बाजार आता पुरातन आणि व्हिंटेज वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

चोर बाजारचा कारभार कसा चालतो?

चोर बाजारमधल्या मिनी मार्केट नावाच्या स्टोअरमध्ये जुने बॉलीवूड पोस्टर्स विक्रीसाठी ठेवलेले असतात. याव्यतिरिक्त इतर अस्सल व्हिक्टोरियन फर्निचर, मोटारगाड्यांचे वेगवेगळे पार्ट्स बदलून देणं या सर्व्हिसेसही इथे दिल्या जातात. अशी अनेक दुकानं या मार्केटमध्ये आहेत.

काही सौदे महाग वाटू शकतात. इथे बार्गेनिंग करणं अनिवार्य मानलं जातं. हे मुळात एक संघटित फ्ली मार्केट आहे. इथे एखाद्याला काय हवे आहे ते शोधण्यासाठी घोळक्याने लोक चकरा मारत असतात आणि त्यांच्या गरजा कळल्यावर त्यांना आपापल्या कमिशन मिळणाऱ्या दुकानात घेऊन जातात.

शोर बाजारचं नाव चोर बाजार (chor bazaar mumbai) कसं पडलं याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे अशी की, राणी व्हिक्टोरियाचं एक व्हायोलिन आणि इतर काही सामान तिने मुंबईसाठी भेट म्हणून पाठवलं होतं. त्या भेटवस्तू तिच्या जहाजातून उतरवताना अचानक बेपत्ता झाल्याचं आढळून आलं. नंतर त्या सगळ्या वस्तू शोर बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. तेव्हापासून शोर बाजारचं नाव चोर बाजार असं पडलं. असं सांगितलं जातं. खरं खोटं माहित नाही. पण हे खूप मोठं मार्केट आहे आणि तुमच्या आवडीच्या अनेक वस्तू इथे स्वस्तात मिळू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.