-
ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजारात (Stock market) सध्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अमेरिकेतील आयात शुल्क वाढ हे दिलं तरी चालेल, अशीच परिस्थिती आहे. कारण, बहुतेक सगळी कारणंही अप्रत्यक्षरित्या का होईना याच मुद्यावर अलवंबून आहेत. २ एप्रिल रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवांवर २६ टक्के आयात शुल्क लागू केलं. याचा मोठा फटका औषध उद्योगाला बसणार हे लगेच स्पष्ट झालं. कारण, भारतातून मोठ्या प्रमाणावर औषधं अमेरिकेत निर्यात होतात. आणि ही निर्यात महागणार म्हटल्यावर औषध कंपन्यांच्या शेअरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार हे उघड होतं. (Cipla Share Price)
सिपला कंपनीचा शेअर अगदी पहिल्या सत्रापासून कोसळला. आणि दिवस बंद होताना १,४१६ रुपयांवर बंद झाला. त्यात एका दिवसांत सुमारे ५ टक्क्यांची किंवा ७९ अंशांची घसरण झाली. शेअरच्या पडझडीमागे इतरही कारणं होती. (Cipla Share Price)
(हेही वाचा – Nanded Accident प्रकरणी पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी जाहीर केली दोन लाखांची मदत)
एकूणच औषध कंपन्यांमध्ये शुक्रवारी घसरण होती. आणि ल्युपिन, सन फार्मा, डॉ रेड्डीज अशा सर्वच औषध कंपन्यांमध्ये ४ ते ६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आणि तोच कल सिपलामध्येही दिसून आला. तसंच अमेरिकेतील निर्यात इथून पुढे कमी होईल ही भीती तर आता सततची आहे.
(हेही वाचा – Namaz पठण जास्त करू नका; कुवैत सरकारचा फतवा)
आणि त्याचा परिणाम शेअरच्या तिमाही निकालांवर पडू शकतो. किंबहुना तो पडणार आहे. नफ्याचं प्रमाणही त्यामुळे कमी होणार आहे. शेअरच्या पडझडीमागे हे एक महत्त्वाचं कारण आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीचा परिणाम जगभरातील बाजारांवर जाणवत आहे. त्यामुळे तो भारतातही दिसणं स्वाभाविक होतं. तोच परिणाम निर्देशांकं आणि शेअरवरही दिसून येत आहे. एकूणच विक्रीचा जोर असताना त्या कचाट्यात सिपला शेअरही सापडला. (Cipla Share Price)
गेल्या महिन्यात सिपलाचा शेअर (Cipla Share Price) जवळ जवळ १२ टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळे देखील शेअरमध्ये नफारुपी विक्री दिसून आली आहे. या शेअरचा वर्षभरातील उच्चांक १,७०२ रुपये इतका आहे. आणि या किमतीपासून शेअर सध्या २० टक्के दूर आहे.
(डिस्क्लेमर – शेअरमधील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community