घर स्वच्छ ठेवल्याने, देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. (Diwali Cleaning Tips) हिंदू धर्मातील नवरात्री आणि दसऱ्यानंतरचा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळीच्या निमित्ताने स्वच्छता करतांना कोणती काळजी घ्यावी, हे येथे पाहूया.
स्वच्छतेसाठीच्या टिप्स :
१. सगळ्यात आधी तुमच्या घरात कानाकोपऱ्यात असलेला पसारा आवरा. तुम्हाला जी वस्तू उपयोगाची वाटत नाही, ती टाकून द्या. कोपऱ्यातील पसारा आवडल्याने घर स्वच्छ आणि मोठा वाटते. तुटलेली भांडी, फाटलेले शूज आणि स्लीपर घरातून काढून टाका आणि जर तुमच्याकडे जुने कपडे असतील, तर ते गरजूंना देऊन टाका.
(हेही वाचा – National Ayurveda Day : प्रत्येक व्याधीला ‘मेडिसिन’ हा पर्याय नाही – वैद्य संतोष जळूकर)
२. जर तुमच्या घरी काम करणारे हात जास्त असतील, तर घराची साफसफाई पूर्णपणे होईल. घर स्वच्छ करतांना फक्त कॉटनच्या कपड्याचा वापर करा. अर्धी बादली पाणी घ्या, त्यात बेकिंग पावडर, सर्फ आणि व्हिनेगर टाका. स्पंज आणि कॉटनच्या कपड्याने हे मिश्रण करा आणि साफसफाईला सुरुवात करा. (Diwali Cleaning Tips)
३. कोळ्याचे जाळे लांब दांडीच्या ब्रशने काढा. पंखा स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पाण्याचा वापर करा. प्रथम पंखा कोरड्या कापडाने स्वच्छ करा, नंतर एकदा पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर कापड साध्या पाण्यात बुडवा. पंखा पुसून टाका. पंखा अगदी नवीन असल्यासारखा दिसेल. (Diwali Cleaning Tips)
(हेही वाचा – Terrorist In Mumbai : मुंबईची गाझा पट्टी बनत आहे ठाणे जिल्ह्यातील ‘पडघा’)
४. लोक अनेकदा वर्षभर त्यांच्या घरातील स्विच बोर्ड साफ करत नाहीत, त्यामुळे ते काळे पडतात. स्विच बोर्डदेखील स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पाण्याचा वापर करा. त्यात एक कापड भिजवा, पाणी पिळून घ्या आणि स्वीच बोर्ड स्वच्छ करा. स्वीच बोर्ड साफ करतांना मुख्य वीज बंद करा अन्यथा पाण्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो.
५. घरातील सर्व मौल्यवान शो पीस, फोटो फ्रेम्स, पेंटिंग्ज, सोफा सेट, बेड, फर्निचर हे कापड किंवा वर्तमानपत्राने पूर्णपणे झाकून ठेवा जेणेकरून साफसफाई करताना या गोष्टींवर धूळ आणि घाण पडणार नाही. (Diwali Cleaning Tips)
हेही वाचा –