Clove Milk Benefits : लवंगाच्या दूधाचे आश्चर्यकारक फायदे

Clove Benefits : अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त लवंग आपल्या आरोग्यासाठीही देखील फायदेशीर आहेत.

322
Clove Milk Benefits : लवंगाच्या दूधाचे आश्चर्यकारक फायदे
Clove Milk Benefits : लवंगाच्या दूधाचे आश्चर्यकारक फायदे

भारतीय पाककृतींमध्ये असे अनेक मसाले आहेत, जे अन्नाची चव वाढवतात. (Clove Milk Benefits) अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त ते आपल्या आरोग्यासाठीही देखील फायदेशीर आहेत. यांपैकी एक मसाल्याचा पदार्थ म्हणजे लवंग. एक लहान लवंग अन्नाची चव दुप्पट करते.

(हेही वाचा – Parliament Smoke Attack : आरोपींची आधी सोशल मीडियातून मैत्री; मग संसद घुसण्याची योजना रचली)

लवंग घातलेले दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. लवंगामध्ये प्रथिने, लोह, कर्बोदके, कॅल्शियम यांसह अनेक पोषक घटक असतात आणि त्यांचा प्रभाव दुधाबरोबर अनेक पटींनी वाढतो. लवंगाचे दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

रक्तदाब

दूध प्यायल्याने रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात रहाण्यास मदत होते. लवंगामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. बीपीच्या रुग्णांना लवंगाचे दूध पिण्याची गरज असते.

आरोग्यदायी पचनक्रिया

ज्यांना बद्धकोष्ठता, अपचन, ओटीपोटात दुखणे यांसारख्या पोटाशी संबंधित आजार आहेत, त्यांनीही लवंग घातलेले दूध प्यावे. त्यामुळे पचनक्रियेला (Healthy digestion) मदत होते आणि पोट स्वच्छ होते.

(हेही वाचा – Hasan Mushrif : महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी; हसन मुश्रीफ यांची माहिती)

हाडे आणि दात

लवंगांमध्ये कॅल्शियम (Calcium) असते आणि ते दुधात मिसळून प्यायल्याने कॅल्शियमची गुणवत्ता वाढते. यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत होतात. दातदुखी, हिरड्यांची सूज, तोंडाची दुर्गंधी यांसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

थकवा दूर होण्यास मदत

लवंग घातलेले दूध प्यायल्याने तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते. यात कॅल्शियम, पोटॅशियम (Potassium) असते. ते शरीराला नवीन ऊर्जा देते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.