- ऋजुता लुकतुके
नथिंग कंपनीचा पहिला सीएमएफ स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. नेहमीपेक्षा हटके डिझाईन हे नथिंग फोनचं वैशिष्ट्य या फोनमध्ये आहेच. शिवाय किंमतही २०,००० रुपयांच्या आत आहे. सुरुवातीला फक्त फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध होणार आहे. फोनला नारिंगी आणि काळ्या रंगाचं काढता येणारं कव्हर आहे. या कव्हरच्या आत मीडिया डिमेन्सिटी ७३०० चा चिपसेट आहे. सध्या या फोनचे दोन व्हेरियंट बाजारात आले आहेत. (CMF Phone 1)
६ जीबी रॅम आणि १२८ जीबीचं स्टोरेज असलेला फोन १५,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. तर ८ जीबी रॅम असलेला फोन १६,९९९ रुपयांना मिळेल. तुमच्याकडे काही टरावीक बँकांची क्रेडिट कार्ड असतील तर याच फोनची किंमत तुम्हाला आणखी एका हजाराची सवलत मिळू शकेल. पण, ही सवलत काही दिवसांसाठीच आहे. (CMF Phone 1)
कंपनी फोनबरोबरच्या ॲक्सेसरीज स्वतंत्रपणे विकत आहे. या फोनबरोबर चार्जर येत नाही. तो तुम्हाला ७९९ रुपयांना विकत घ्यावा लागतो. लॅनयार्ड, कार्डहोल्डर आणि स्टँड या वस्तूही ७९९ रुपयांना मिळणार आहेत. तर फोनबरोबर येणाऱ्या बॅक कव्हरची किंमत १४९९ रुपये इतकी आहे. (CMF Phone 1)
CMF Phone 1 👇👇
– 6.67 inch AMOLED display
– 120Hz refresh rate
– 2,000 nits of peak brightness
– IP52 rating
– 5,000mAh battery
– 33W charging , 5W wired reverse charging
– MediaTek Dimensity 7300 chipset
– Android 14 , Nothing OS 2.6.0
– 2 years of OS upgrades , 3 years of… pic.twitter.com/B475j50NZF— TECHYVERSE (@_Ameer_010) July 8, 2024
(हेही वाचा – Terrorist Attack: कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांनी हल्लेखोरांना दिलं जोरदार प्रत्युत्तर)
सीएमएफ फोन १ चा डिस्प्ले हा ६.७ इंचांचा आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ इतका आहे. डिस्प्लेची प्रखरता ७०० ते १२०० नीट्स इतकी आहे. सध्या हा फोन अँड्रॉईड १४ प्रणालीवर चालतो. आणि पुढील दोन वर्षांसाठी कंपनीने अँड्रॉईड आणि सुरक्षेचे अपग्रेड देऊ केले आहेत. अँड्रॉईड १६ पर्यंत हा फोन अपग्रेड होऊ शकेल. (CMF Phone 1)
फोनबरोबर चार्जर येत नसला तरी फोनची बॅटरी ५,००० एमएअच क्षमतेची आहे आणि ३३ वॅट्सचा फास्ट चार्जरही उपलब्ध आहे. फक्त ग्राहकांना तो वेगळा खरेदी करावा लागेल. फोनमधील प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलसाठी असलेला कॅमेरा हा १६ मेगापिक्सेलचा आहे. (CMF Phone 1)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community