१८५ नारळाच्या झाडांनी बहरलेली दादरची ‘नारळी बाग’

समुद्रकिनारा आणि आकाशाचे निर्मळ दृश्य, खळखळणाऱ्या लाटांच्या आवाज, वाऱ्याची झुळूक आणि डोलणारी नारळाची झाडे आणि याच्या अगदी मागे सीलिंकवरून सूर्यास्त होतानाचे विहंगम दृश्य हा निसर्गरम्य अनुभव तुम्हाला याठिकाणी अनुभवता येईल. शहरातील दैनंदिन गर्दी आणि प्रदूषणाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक उत्तम जागा असणारी ही नारळी बाग 185 नारळाच्या झाडांनी बहरलेली आहे.

सीलिंकचे दृश्य

मुख्य गेटमधून तुम्ही बागेत प्रवेश करताच, गेटवे ऑफ इंडियाची आठवण करून देणारी एक मोठी कमान तुमचे स्वागत करते. 2009 मध्ये स्वामी नारायण मंदिर ट्रस्टने उभारलेल्या या कमानीच्या आत वेगवेगळ्या 1 हजार 8 गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत. बागेच्या अगदी मागे, तुम्ही वांद्रे ते वरळीपर्यंतचा विशाल सीलिंक पाहू शकता. संपूर्ण बाग काँक्रीटच्या मार्गाने दोन भागात विभागली आहे. एका बाजूला गवताची हिरवी कुरणे तर दुसऱ्या बाजूला लाल माती पसरली आहे.

( हेही वाचा : ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा 60 ते 70 टक्के जास्त संसर्गजन्य! वाचा तज्ज्ञांचे मत )

महाविद्यालयीन मुलांना हक्काची जागा

अनेक वर्षांपूर्वी येथे दोन बागा होत्या. या उद्यानाचा कायापालट करून, याचे फेब्रुवारी 2009 मध्ये पुन्हा उद्घाटन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी याठिकाणी नृत्याचे धडे गिरवतात तर, काही विद्यार्थी याठिकाणी विविध उपक्रमांची तयारी करत असतात. एकंदरच काय तर ही बाग निसर्गरम्य दृश्यासह संस्कृती, कला जोपसण्याकरिता तरूण पिढीला सहकार्य करते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here