धारावीच्या कुशीत वसलेला हा कुंभारवाडा व येथील दिवाळीच्या पणत्यांचा अनोखा मेळ दरवर्षीचं चर्चेचा विषय ठरतो. पारंपरिक मातीच्या पणत्यांपासून ते आधुनिक नक्षीच्या, अनोख्या, रंगीबेरंगी पणत्या येथे उपलब्ध आहेत. कुंभारवाड्यातील पणत्या दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने या पणत्यांना देशभरात मागणी आहे. याठिकाणी १ रुपयापासून ते ५०० रुपयापर्यंत आपण पणत्या खरेदी करु शकतो. मुंबईतील अनेक व्यापारी कुंभारवाड्यातून माफक दरात पणत्या खरेदी करतात व याच, पणत्या बाहेर दुकान, मॉल्समध्ये जवळपास चौपट दराने विकल्या जातात. स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याची हीच, सुवर्णसंधी आहे.
Join Our WhatsApp Community