Colossal Squid : एक रहस्यमयी समुद्री जीव “स्क्विड”ची लांबी किती असते? आणि हा जीव खरोखरंच अस्तित्वात आहे का?

37
Colossal Squid : एक रहस्यमयी समुद्री जीव
Colossal Squid : एक रहस्यमयी समुद्री जीव "स्क्विड"ची लांबी किती असते? आणि हा जीव खरोखरंच अस्तित्वात आहे का?

स्क्विड या प्रजातीचा शोध १०० वर्षांपूर्वी लागला. त्यानंतर पहिल्यांदाच नैसर्गिक वातावरणामध्ये एका प्रचंड मोठ्या स्क्विडचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. (Colossal Squid)

दक्षिण अटलांटिक महासागरात (South Atlantic Ocean) असलेल्या साउथ सँडविच बेटांजवळ ६०० मीटर म्हणजेच १,९६८ फूट एवढ्या खोलीवर ३० सेमी म्हणजेच ११.८ इंच लांबी असलेला हा प्राणी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

एसेक्स विद्यापीठाच्या एका शैक्षणिक संस्थेच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांचं एक पथक मार्च महिन्यामध्ये नवीन सागरी जीव शोधण्यासाठी मोहिमेवर गेलं. ३५ दिवसांच्या या शोध मोहिमेदरम्यान स्क्विडचं हे फुटेज रेकॉर्ड केलं गेलं.

त्या फुटेजनुसार तज्ञांचा असा विश्वास आहे की, तो स्क्विड ७ मीटर म्हणजेच २३ फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. त्याप्रमाणेच त्याचं वजन ५०० किलोग्राम म्हणजेच १,१०० पौंड असू शकतं. त्यामुळे तो पृथ्वीवरचा सर्वांत वजनदार अपृष्ठवंशी प्राणी म्हणून ओळखला जाईल. (Colossal Squid)

(हेही वाचा – मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

हा शोध या प्राण्यांची ओळख पटवल्याच्या आणि त्याला नाव दिल्याच्या १०० व्या वर्धापनदिनानिमित्त लागला.

श्मिट ओशन इन्स्टिट्यूटच्या फाल्कोर नावाच्या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी हे शोधून काढण्यासाठी रिमोट-कंट्रोल्ड वाहनाचा वापर केला होता.

विद्यापीठातल्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. मिशेल टेलर म्हणाल्या की, सुरुवातीला टीमला खात्री नव्हती की स्क्विड काय आहे… पण तो प्राणी अतिशय सुंदर आणि असामान्य होता. म्हणून त्याचं चित्रीकरण केलं.

त्यानंतर डॉ. कॅट बोलस्टॅड (Dr. Kat Bolstad) यांनी हे फुटेज सत्यापित केलं. त्यांनी असं सांगितलं की, यापूर्वी स्क्विड बहुतेकदा व्हेल आणि समुद्री पक्ष्यांच्या पोटात अवशेष म्हणून सापडले होते.

प्रचंड स्क्विडच्या जीवनचक्राबद्दल फारशी काही माहिती नाही. पण ते जसळसे मोठे होतात तसतसे त्यांची पारदर्शकता निघून जाते. मृत पावलेले प्रौढ स्क्विड यापूर्वी मासेमारी करणाऱ्या लोकांना बऱ्याचदा सापडले आहेत. पण त्यांना कधीही खोलवर जिवंत पाहिलं गेलं नाही. (Colossal Squid)

नॅचरल हिस्ट्री म्युझियमने असं सुचवलं आहे की, प्रचंड स्क्विडच्या जागतिक लोकसंख्येचा अंदाज लावणं कठीण आहे. शास्त्रज्ञांनी असंही उघड केले की, जानेवारीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच हिमनदीच्या काचेसारख्या पृष्ठभागावरून स्क्विडचं फुटेज टिपलं.

श्मिट ओशन इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. ज्योतिका विरमाणी (Dr. Jyotika Virmani) असं म्हणाल्या की, “एका मागोमाग एक अशा करण्यात आलेल्या मोहिमांमध्ये दोन वेगवेगळ्या स्क्विडचं हे पहिलं दर्शन उल्लेखनीय आहे. तसंच दक्षिण महासागरात वास्तव्य करणाऱ्या या प्रचंड भव्य रहिवाशांना आपण किती कमी पाहिलं आहे हे दिसून येतं. हे अविस्मरणीय क्षण आपल्याला ही आठवण करून देतात की, महासागराचं रहस्य अद्यापही मानवाला पूर्णपणे उलगडलेलं नाही. अशा कितीतरी रहस्यांनी महासागर भरलेला आहे.” (Colossal Squid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.