कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसतोय. या शोच्या संकल्पनेनुसार सर्व स्पर्धकांना तुरुंगात ठेवण्यात येत आहे. यादरम्यान मुनव्वर फारुकी लॉक अपच्या बनावट तुरुंगात बसवलेल्या कॅमेऱ्यासमोर खऱ्याखुऱ्या तुरुंगात घालवलेल्या दिवसांचा अनुभव शेअर करताना दिसला.
‘लॉक अप’ या शोच्या निर्मात्यांनी ‘लॉक अप’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅमेऱ्याशी बोलताना मुनव्वर फारुकीने असे सांगितले की, तुरुंगात वेळ घालवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे पण सर्वात कठीण काम देखील आहे. तुरुंगात घालवलेल्या दिवसांची आठवण करून देताना हा विनोदी कलाकार म्हणाला की, तो टाइमपास करण्यासाठी तुरुंगात फिरत असे, पण तुरंगाची बॅरेक एवढी लहान आणि गर्दीने भरलेली होती की दुसऱ्या कैद्याला धक्का लागू नये म्हणून चालताना खूप काळजी घ्यावी लागत होती. कारण असे झाल्यास वाद-विवाद होत होते.
(हेही वाचा – ओबीसी आरक्षणावरील विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर)
बघा व्हिडिओ काय म्हणाला मुनव्वर फारुकी
#LockUppLeaks@munawar0018 pic.twitter.com/GYUgTEIbGA
— ALTT (@altt_in) March 5, 2022
सकाळी सहा ते सात अंश सेल्सिअस तापमान असताना तो फिरायचे. तुरुंगात कैद्यांना शूज दिले जात नसल्याने अशा थंडीत तो अनवाणी फिरायचा. मुनव्वर म्हणाला, ‘मी 7 च्या सुमारास चालायला सुरूवात करायचो, 3-4 तास चालल्यानंतर खूप थकवा जाणवायचा आणि माझे पाय थंडीत दगडासारखे व्हायचे. चालून 4-5 तास झाले असतील असे वाटायचे. पण नंतर घड्याळाकडे बघितले आणि फक्त 7:45 वाजले होते, फक्त 45 मिनिटे झाली होती. मुनव्वर पुढे म्हणाला की, ‘मनात बरेच काही चालू असल्याने तुरुंगात वेळ जायचा नाही आणि प्रत्येक क्षणी हेच विचार बदलत राहयचे.’ दरम्यान, मुनव्वर फारुकीला गेल्या वर्षी इंदूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि तो अनेक दिवस तुरुंगात होता.
Join Our WhatsApp Community