constable salary : भारतात constable ला किती असतो पगार?

186
constable salary : भारतात constable ला किती असतो पगार?

भारताचा कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणेच हवालदारांवरही जबाबदारी आहे. पोलीस हवालदारांचे अधिकार मर्यादित असतात. पण त्यांनी अभिमानाने, प्रामाणिकपणाने आणि शिस्तबद्धतेने आपलं काम केलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समाजात मोठा प्रभाव दिसू शकतो. भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा पगार हा वेगवेगळा असतो. तरीही भारतीय पोलीस कॉन्स्टेबलचा पगार सरासरी प्रतिवर्षं ₹२.६७ लाख असणं अपेक्षित आहे. (constable salary)

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस कॉन्स्टेबलच्या पगाराची माहिती सांगणार आहोत. भारतात पोलीस कॉन्स्टेबलचा पगार हा राज्य, कामाचा अनुभव आणि नियुक्तीचा प्रकार या गोष्टींवर अवलंबून असतो. भारतामध्ये पोलीस कॉन्स्टेबलला सुरुवातीला देण्यात येणारा पगार हा साधारणपणे ₹२०,००० ते ₹२५,००० प्रति महिना असतो. तरीही हा पगार राज्य आणि अधिकार क्षेत्रानुसार बदलू शकतो. (constable salary)

(हेही वाचा – Double Hat – Trick in T20 : अर्जेंटिनाच्या फेनेलची टी-२० क्रिकेटमध्ये दुहेरी हॅट ट्रिक)

मूळ पगाराव्यतिरिक्त पोलीस कॉन्स्टेबलला वैद्यकीय विमा, पेन्शन, वाहतूक, निवास आणि गणवेश यासाठी इतर भत्ते यांसारख्या अनेक सुविधा देखील मिळू शकतात. राज्य आणि अधिकार क्षेत्रानुसार मिळणाऱ्या सुविधा आणि भत्तेही बदलू शकतात. हे लक्षात घेणं महत्वाचे आहे की, एका पोलीस कॉन्स्टेबलचा पगार कालांतराने बढती आणि प्रगतीच्या इतर संधींसोबतच वाढू शकतो. (constable salary)

एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या अनुभव आणि कामगिरीच्या आधारावर हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक उपनिरीक्षक आणि उपनिरीक्षक यांसारख्या उच्च पदांवर पदोन्नतीसाठी पात्र ठरू शकतो. यांपैकी प्रत्येक रँक हे उच्च पगार आणि अधिक जबाबदाऱ्यांसोबतच मिळते. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधला पोलीस कॉन्स्टेबलचा पगार खालीलप्रमाणे दिला आहे.. (constable salary)

(हेही वाचा – Digital Fraud: पोलीस कर्मचारीच झाला डिजिटल फसवणुकीचा शिकार, QR कोड स्कॅन केल्यानंतर 2.2 लाख रुपये गायब!)

झारखंड पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 2,80,000 LPA

तामिळनाडू पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 3,00,000 LPA

उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 3,70,000 LPA

तेलंगणा पोलीस कॉन्स्टेबलचा पगार
रु. 380,000 LPA

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 3,60,000 LPA

पंजाब पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 3,40,000 LPA

दिल्ली कॉन्स्टेबल पगार
रु. 4,60,000 LPA

WBP कॉन्स्टेबल पगार
रु. 2,20,000 LPA

बिहार पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 4,30,000 LPA

कर्नाटक पोलीस कॉन्स्टेबल पगार
रु. 3,50,000 LPA

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.